लंडन : फ्रेंच ओपन पटकावून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केल्यानंतर जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच चौथ्यांदा विम्बल्डन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे त्याने यंदाची विम्बल्डन जिंकल्यास सलग तिसऱ्यांदा तो या स्पर्धेत बाजी मारेल. त्याचप्रमाणे त्याने हे विजेतेपद पटकावल्यास गेल्या ४७ वर्षांमध्ये कॅलेंडर ग्रँडस्लॅम मिळवणारा तो पहिला खेळाडूही ठरेल. त्यामुळेच यंदा जोकोच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या जोकोचा धडाका पाहता त्याला या स्पर्धेत रोखणे इतर खेळाडूंसाठी कठीण असेल. त्यातच प्रमुख प्रतिस्पर्धींपैकी एक स्पेनचा राफेल नदाल मनगटाच्या दुखापतीमुळे विम्बल्डन खेळणार नसून स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर गेल्या चार वर्षांपासून एकही ग्रँडस्लॅम पटकावण्यापासून वंचित राहिला आहे. त्याच वेळी २०१३ साली विम्बल्डन पटकावलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेकडून जोकोला कडवी झुंज मिळू शकते. (वृत्तसंस्था)
जोको विम्बल्डन ‘चौकार’ मारण्यास सज्ज
By admin | Published: June 27, 2016 4:06 AM