ऑनलाइन लोकमत -
रिओ दी जानेरो, दि. 10 - रिओ ऑलिम्पिकमध्ये पत्रकारांच्या बसवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात एक पत्रकार जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. हा हल्ला नेमका कशा पद्धतीने करण्यात आला याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. हल्ल्यानंतर समोर आलेल्या फोटोमध्ये बसच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. मात्र फायरिंग करण्यात आली की दगड फेकण्यात आला हे नेमकं कळू शकलं नसल्याचं बसमधील एका पत्रकाराने सांगितलं आहे.
बसवर हल्ला झाल्यानंतर आम्ही सगळेजण सुरक्षेसाठी बसमधेच थांबले होते. पोलिसांनी येऊन आम्हाला सुरक्षितरित्या प्रेस सेंटरला पोहोचवलं असल्याचंही पत्रकाराने सांगितलं. ऑलिम्पिक कव्हर करुन झाल्यानंतर हे सर्व पत्रकार प्रेस सेंटरला जात असताना हा हल्ला झाला.