बंगळुरू : भारताचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ म्हणून एक काळ क्रिकेटविश्व गाजवलेल्या राहुल द्रविडच्या मुलाने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना क्लब क्रिकेटमध्ये आपल्या संघासाठी १२५ धावांची तडाखेबंद खेळी खेळली.१० वर्षीय समितने १४ वर्षांखालील टायगर चषक स्पर्धेत बंगळुरू युनायटेड क्रिकेट क्लब (बीयूसीसी) संघाकडून खेळताना १२ चौकारांसह १२५ धावांची शानदार खेळी केली. यासह संघाला फ्रेंक अँथोनी पब्लिक स्कूल संघाविरुद्ध २४६ धावांनी विजयी करण्यात समितने मोलाचे योगदान दिले. समितने निर्णायक खेळी करताना प्रत्युष जी. सह महत्त्वपूर्ण भागीदारी करताना ३०-३० षटकांच्या या सामन्यात आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. प्रत्युषने या सामन्यात सर्वाधिक १४३ धावा कुटल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी करून फ्रेंक अँथोनी संघाला विजयासाठी ३२६ धावांचे भलेमोठे आव्हान दिले.
ज्युनिअर द्रविडचे शानदार शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 2:32 AM