शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ज्युनिअर संघाला जेतेपद

By admin | Published: December 22, 2015 3:04 AM

डावखुरा मध्यमगती गोलंदाज खालिद अहमदच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध मारा आणि सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताच्या

कोलंबो : डावखुरा मध्यमगती गोलंदाज खालिद अहमदच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध मारा आणि सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताच्या अंडर-१९ क्रिकेटपटूंच्या संघाने अंतिम लढतीत यजमान श्रीलंकेचा ९७ चेंडू व ५ गडी राखून सहज पराभव केला आणि तिरंगी मालिकेत जेतेपदाचा मान मिळवला. भारतीय संघाने विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य ३३.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सुंदर (५६) व ऋषभ पंत (३५) यांनी सलामीला ८९ धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली होती.त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय श्रीलंका अंडर-१९ संघाच्या अंगलट आला. भारतातर्फे अवेश खानने २४ धावांच्या मोबदल्यात २ आणि खालिदने २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत यजमान संघाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. श्रीलंका संघाची ७ बाद ८१ अशी अवस्था झाली होती. विशाद रंदिका डिसिल्वा (५६) याने अर्धशतकी खेळी करताना दमिता सिल्वा (२३) याच्यासोबत आठव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केल्यामुळे श्रीलंका संघाला दीडशेचा पल्ला ओलांडता आला. श्रीलंका संघाचा डाव ४७.२ षटकांत १५८ धावांत संपुष्टात आला. सुंदर व पंत यांनी भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. पंतने डावातील तिसऱ्या षटकात असिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. त्याने चॅरित असालंकाच्या गोलंदाजीवर षटकारही ठोकला, पण या आॅफस्पिनरच्या पुढच्याच षटकात तो माघारी परतला. सुंदरने अर्धशतकी खेळीत काही आकर्षक फटके मारले. सुंदरने ७७ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार ठोकले. रिकी भुई (नाबाद २९ धावा, १ चौकार व १ षटकार) याने संयमी फलंदाजी करताना संघाला लक्ष्य गाठून दिले. जेतेपद पटकावणाऱ्या अंडर - १९ संघाचे बीसीसीआयने अभिनंदन केले. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टिष्ट्वट केले, ‘श्रीलंकेत तिरंगी मालिका जिंकणाऱ्या भारताच्या अंडर-१९ संघाचे अभिनंदन. द्रविडचे मार्गदर्शन व खेळाडू घेत असलेली मेहनत, याचे परिणाम दिसत आहेत.’ दिग्गज फलंदाज राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. (वृृत्तसंस्था)