शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

जोकोची ‘सिनसिनाटी’ हार

By admin | Published: August 16, 2014 12:10 AM

विम्बल्डन चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच याला सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत तिसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

सिनसिनाटी : विम्बल्डन चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच याला सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत तिसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवातील अव्वल स्थानावर असलेल्या जोकोला स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोकडून हा पराभव पत्करावा लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आगामी यूएस ओपनमध्ये १६वे मानांकन मिळालेल्या रॉब्रेडोने जोकोवर ७-६ (८-६), ७-५ असा दणदणीत विजय मिळवला. जोकोला २५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या वर्षाच्या शेवटच्या ग्रॅण्ड स्लॅममध्ये या पराभवाच्या आठवणी घेऊन उतरावे लागणार आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही कुठेतरी डळमळला असेल. रॉब्रेडोला पुढील फेरीत स्पेनच्याच डेविड फेररशी मुकाबला करावा लागेल. फेररने रुसच्या मिखाइल युज्नीवर ७-५, ६-० असा विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित आणि पाच वेळा सिनसिनाटी मास्टर्सचा किताब पटकावणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने फ्रान्सच्या गेल मोनफिसचा तीन सेटमध्ये रंगलेल्या लढतीत ६-४, ४-६, ६-३ असा विजय साजरा केला. फेडररला उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंच्या अ‍ॅण्डी मरेशी मुकाबला करावा लागेल. मरेने अमेरिकेच्या जॉन इशनरचा दोन तास चाललेल्या लढतीत ६-७, ६-४, ७-६ असा पराभव केला. आॅस्ट्रेलियन ओपनचा चॅम्पियन स्टेन वावरिंका यानेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. तिसऱ्या मानांकित या खेळाडूने क्रोएशियाच्या मारिन सिलिचचा ३-६, ६-०, ६-१ असा पराभव केला, तर फॅबिओ फॉग्नीनी याने पहिला सेट गमावूनही दमदार कमबॅक करून टायवानच्या लू येन हसुनचा ३-६, ६-३, ६-३ असा पराभव केला.