शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा अखेर टीओपीत दाखल

By admin | Published: September 15, 2015 11:46 PM

उशिरा का होईना पण, अखेर ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांचा टीओपी योजनेमध्ये समावेश करीत मंत्रालय व मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदविरुद्ध पक्षपातीपणाचा

नवी दिल्ली : उशिरा का होईना पण, अखेर ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांचा टीओपी योजनेमध्ये समावेश करीत मंत्रालय व मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदविरुद्ध पक्षपातीपणाचा या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या आरोपामुळे उद््भवलेल्या वादावर पूर्णविराम लागला. ज्वाला व अश्विनी यांच्या व्यतिरिक्त पुरुष दुहेरीतील जोडी सुमित रेड्डी व मनू अत्री यांचाही टारगेट आॅलिम्पिक पोडियम (टीओपी) योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मंत्रालयाने प्रसिद्धिला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,‘बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा, सुमित रेड्डी व मनू अत्री यांची टीओपी योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यांना रिओ आॅलिम्पिक २०१६ च्या तयारीसाठी एनएसडीएफतर्फे आर्थिक मदत मिळेल.’मलेशियाचे प्रसिद्ध दुहेरीचे प्रशिक्षक किम तान हर यांच्यासोबत भारतीय बॅडमिंटन महासंघाने पाच वर्षांचा करार केलेला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, ‘आता दुहेरीतील खेळाडू पुढील रिओमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकच्या तयारीसाठी रणनीती तयार करू शकतात. या खेळाडूंना पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये मंत्रालयाने स्पष्ट केले की, दुहेरीतील मुख्य प्रशिक्षकांसोबत चर्चा करून रणनीती तयारी करणे आणि आवश्यक सोयी सुविधांची यादी पाठविण्यात यावी.’टीओपी योजनेसाठी यापूर्वी निवड झालेल्या सहा बॅडमिंटनपटूंमध्ये लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, दोनदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली पी.व्ही. सिंधू यांच्या व्यतिरिक्त पारुपल्ली कश्यप, के. श्रीकांत, गुरू साईदत्त आणि एच.एस. प्रणय यांचा समावेश आहे. यानंतर ज्वाला व अश्विनी यांनी त्यांनाही या योजनेमध्ये स्थान देण्याची मागणी केली होती. जुलैमध्ये क्रीडा मंत्रालयाने या दोघींचा यात समावेश करण्याचा निर्णय घेतला. एकेरीतील सहा खेळाडूंचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता तेव्हापासून ज्वाला व अश्विनी मंत्रालय व गोपीचंद यांच्याबाबत नाराजी व्यक्त करीत होत्या. गोपीचंद टीओपी समितीमध्येही आहेत. ज्वाला व अश्विनी यांनी २०११ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य, २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि २०१४ मध्ये रौप्य पदक पटकावले आहे. त्यांनी गेल्या वर्षी उबेर कप व आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला. मनू आणि सुमित यांनी गेल्या रविवारी बेल्जियम इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये जेतेपद पटकावले. त्यांनी जुलै महिन्यात लागोस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. (वृत्तसंस्था)