भारताची कुस्तीपटू बबिता फोगाटनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची बरीच चर्चा सुरू आहे. तिनं तबलिगी जमातवर टीका करताना देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढण्यास ते कारणीभूत असल्याचा आरोप केला. या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकाही होत आहे, तर अनेक जण तिच्या समर्थनातही उतरले आहेत. या मुद्द्यावर भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं तिचं मत व्यक्त केलं. तिनं या मतात बबिताच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता, परंतु एका फॉलोअर्सनं तिच्या मतावर रिल्पाय देताना बबिताला 'Terrorist' म्हणून संबोधले. त्यावर ज्वाला भडकली.
बबिता फोगाटची 'तबलिगी जमात' वर वादग्रस्त पोस्ट; महाराष्ट्रात पोलीस तक्रार दाखल
अर्जुन पुरस्कार विजेती ज्वाला म्हणाली,''मला ट्रोल करण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की मी एक भारतीय आहे. भारतीय म्हणून मी पदक जिंकली आहेत आणि तेव्हा कोणी माझी जात-धर्म पाहीला नाही. माझ्या पदकाचं सेलिब्रेशन प्रत्येक भारतीयांनी केलं. कृपया आपल्या महान देशाचं असं विभाजन करू नका, एकजुटीनं राहा.''
दरम्यान, ज्वालानं बबिताला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्याची विनंती केली. ''हा व्हायरस कोणताही जात-धर्म पाहत नाही. तुला मी विनंती करते की तुझं ट्विट डिलीट कर. आपण खेळाडू आहोत आणि आपण धर्मनिरपेक्ष देशाचे प्रतिनिधित्व करतो,'' असं ज्वाला म्हणाली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Viral Video : 'शीला की जवानी' वर थिरकला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर
MS Dhoniचा तीन वर्षांचा Future Plan ठरलाय!