विश्वचषक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सोनिया चहल ( 57 किलो) आणि इंडिया ओपन सुवर्णपदक विजेती भाग्यबती कचारी(81 किलो) यांनी मुंडयाद इंडोर स्टेडियमवर पार पडलेल्या चौथ्या एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णकामगिरी करत रेल्वेला सहा सुवर्णपदकांसह वर्चस्व राखण्यात आपले योगदान दिले. 2016 च्या राष्ट्रीय चॅम्पियन सोनियाने हरयाणाच्या युथ वर्ल्ड चॅम्पियन साक्षीला 3-2अशा फरकाने हरवले. 81 किलो गटाच्या अंतिम सामन्यात भाग्यबती कचारीने शैली सिंगला 5-0 असे नमवित सुवर्णकामगिरी केली.
युथ वर्ल्ड चॅम्पियन ज्योतीने रेल्वेकडून खेळताना चमक दाखविली. ज्योतीने हरयाणाच्या रितु ग्रेवालने 51 किलो वजनी गटात 5-0 अशा फरकाने विजय मिळवला.48 किलो वजनीगटात मोनिकाने अखिल भारतीय पोलिसांच्या के. बीना देवीला 5-0 अशा फरकाने पराभूत केले. 64 किलो वजनी जेतेपदासाठी रेल्वेच्या ‘पविलाओ बासुमात्री’ आणि तिच्या राज्यातील अंकुशिता बोरो यांच्यात खेळला गेला. कोलोन विश्वचषक स्पर्धेची रौप्यपदक विजेती बासुमात्रीने अखेर युवा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या खेळाडूवर 3-2 असा विजय मिळवला.
कविता चहल (81 किलोहुन अधिक) आणि मीनाकुमारी देवी ( 54 किलो) यांनी सुवर्णपदक जिंकत अखिल भारतीय पोलिसांसाठी चांगली कामगिरी केली. अर्जुन पुरस्कार आणि दोन वेळच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी कविता चहलने हरयाणाच्या अनुपमावर 5-0 असा विजय मिळवला. मीनाकुमारी देवीने मार्ग सुलभ नसला तरीही यशस्वीरित्या तिच्या सुवर्ण पदकाचा बचाव केला. मीनाकुमारी अंतिम फेरीत मिनाक्षीवर 4-1 असा विजय नोंदवला.
हरयाणाला एकमात्र सुवर्णपदक नुपूरने 75 किलो वजनीगटात मिळवून दिले.नुपूरने केरळची जायंट किलर इंद्रजाला 4-1 असे पराभूत केले.69 किलो वजनीगटात राजस्थानच्या ललिताने रेल्वेच्या मीना राणीवर 5-0 असा विजय मिळवत सुवर्ण कामगिरी केली.