मुंबई : शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेत एयर इंडिया, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. तर सेंट्रल रेल्वे डिव्हिजन संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला गटात जिजामाता महिला संघ, ओम ज्ञानदीप व विश्वशांती क्रीडा मंडळ यामहिला संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
विशेष व्यावसायिक 'ड' गटात झालेल्या एयर इंडिया विरुद्ध सेंट्रल रेल्वे डीविजन सामन्यांत एयर इंडियाने ३५-२३ अशी बाजी मारत गटात दुसऱ्या विजयासह बादफेरीत प्रवेश केला. एयर इंडिया कडून आदीनाथ गवळी, अस्लम इमानदार व अदित्य शिंदे यांनी चांगला खेळ केला. 'ड' गटातील शेवटचा व निर्णायक सामना मुंबई पोलीस विरुद्ध सेंट्रल रेल्वे डीविजन यांच्यात अंत्यत चुरशीचा झाला. मुंबई पोलीसने २५-२३ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश मिळवला. मध्यंतरा पर्यत १४-०९ अशी मुंबई पोलीस कडे आघाडी होती. 'अ' गटात भारत पेट्रोलियमने ४४-१६ असा सेंट्रल बँक ऑफ इंडियावर विजय मिळवत बादफेरीत प्रवेश मिळवला. 'क' गटात युनियन बँक विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अशी लढत झाली. युनियन बँकेने ३३-२२ असा विजय संपादन केला.
महिला गटात ओम ज्ञानदीप मंडळाने ३७-३३ असा श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळावर विजय मिळवला. विश्वशांती क्रीडा मंडळ विरुद्ध अमर भारत यांच्यात चांगली लढत झाली. मध्यंतरापर्यत १२-११ अशी नाममात्र १ गुणांची आघाडी विश्वाशांती मंडळकडे होती. शेवटच्या मिनिटापर्यत रंगलेल्या या सामन्यात विश्वाशांती मंडळाने २५-२३ अशी बाजी मारली. जिजामाता महिला संघाने ६०-१५ असा महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लबचा धुव्वा उडवला.