मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २२ मार्च या कालावाधीत मंडळाच्या कामगार केसरी आणि कुमार केसरीसह विविध वजनी गटात स्पर्धा रंगेल.मुंबई शहर तालिम संघाच्या सहकार्याने मॅटवर खेळवण्यात येणारी ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल. ७५ ते ८५ किलो वजनी गटातील कामगारांसाठी कामगार केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्यांना मानाचा पट्टा, गदा व रोख रकमेने गौरविण्यात येणार आहे. तर कामगारांच्या पाल्यांसाठी कुमार केसरी कुस्ती होणार असून या स्पर्धेत १८ वर्ष पूर्ण आणि ५५ किलो वजनी गटातील स्पर्धक भाग घेऊ शकतात.स्पर्धेच्या प्रवेशिका १८ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येतील, अशी माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. पैलवानांची वजने १९ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आणि २० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येतील. ‘स्पर्धकांनी संबंधित आस्थापनेच्याअधिकृत पत्राद्वारे अर्ज पाठवावा. पालकाची डिसेंबर २०१६ ची वेतन पावती किंवा व्यवस्थापनाचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. तसेच, रेशन कार्डची साक्षांकित प्रत देखील जोडावी,’ असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईत रंगणार कामगार केसरी कुस्ती स्पर्धा
By admin | Published: March 07, 2017 4:18 AM