ऑनलाइन लोकमतरांची, दि. 20 - ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दिलेल्या 452 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना पुजाराच्या द्विशतकी आणि साहाच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने पहिल्या डावात 152 धावांची आघाडी घेतली होती. रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने दोन बळी घेत कांगारुंना अडचणीत टाकले होते. पण अखेरच्या दिवशी कांगारुंनी चिवट फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखला. भारताकडून जाडेजाने चार बळी घेत सामन्यात रंगत निर्माण केली. 525 चेंडूत 202 धावांची मॅरेथॉन खेळी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कसोटीचा पाचवा दिवस ऑस्ट्रेलियाच्या 58 धावांच्या आघाडीसह 6 बाद 204 असा संपला. ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्श (52) आणि पीटर हॅण्ड्सकॉम्ब (नाबाद 72) यांनी पाचव्या विकेटसाठी 124 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवून दिले. तर भारताकडून रविंद्र जडेजाने 54 धावांमध्ये 4 विकेट्स घेऊन भारताच्या विजयी आशा पल्लवित केल्या होत्या. अश्विन आणि शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात सावध सुरुवात करणा-या ऑस्ट्रेलियाला भारताने दोन फलंदाजांना बाद करत सामन्यावर पकड मजबूत केली होती. पण लंचनंतर पाचव्या विकेटसाठी शॉन मार्श (52) आणि पीटर हॅण्ड्सकॉम्ब (नाबाद 72) यांनी 124 धावांची भागीदारी रचून सामना अनिर्णीत राखण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावली. दरम्यान, पहिला डाव भारताने 603 धावांवर घोषित करुन ऑस्ट्रेलियावर 152 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचे दोन गडी बाद करुन भारताने ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलले. भारताला आज विजयाची सर्वाधिक संधी असून सर्व मदार आता गोलंदाजांवर आहे. चेतेश्वर पूजाराची व्दिशतकी खेळी (202), वृद्धीमान सहाचे शतक (117) आणि रविंद्र जाडेजाचे अर्धशतक (54) यांच्या फलंदाजीमुळे भारताला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेता आली. चेतेश्वरने द्रविडचा विक्रम मोडला!पुजारा एका डावात ५०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने कारकिर्दीतील तिसऱ्यांदा तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्यांदा द्विशतकी खेळी केली. पुजाराने द्विशतकी खेळीदरम्यान ५२५ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकारांच्या मदतीने २०२ धावा केल्या.चेंडूंचा विचार करता सर्वांत मोठी खेळी करताना पुजाराने त्याचा आदर्श असलेल्या राहुल द्रविडचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. द्रविडने एप्रिल २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २७० धावांची खेळी करताना ४९५ चेंडू खेळले होते. पुजाराने पाच सत्रांपेक्षा अधिक वेळ फलंदाजी करताना खेळपट्टीवर ११ तास १२ मिनिट तळ ठोकला.आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने २३३ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. साहा याने पुजारासोबत सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. जडेजाने ५५ चेंडूंमध्ये पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा फटकावीत भारताला दीडशेपेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून दिली.
तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात कांगारुना यश
By admin | Published: March 20, 2017 5:13 PM