शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

कांगारूंचा दमदार सराव

By admin | Published: February 18, 2017 1:21 AM

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दमदार सराव करून घेताना बलाढ्य आॅस्टे्रलियाने भारत ‘अ’ विरुद्ध सराव सामन्याच्या

मुंबई : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दमदार सराव करून घेताना बलाढ्य आॅस्टे्रलियाने भारत ‘अ’ विरुद्ध सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ५ बाद ३२७ धावा उभारल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१०७) आणि शॉर्न मार्श (१०४) यांनी शतकी खेळी करीत भारतीय संघाला इशारा दिला आहे. त्याचवेळी, भारताच्या गोलंदाजांना कांगारूंना रोखण्यात अपयश आले. ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धोकादायक सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (२५) आणि मॅट रेनशॉ (११) यांना झटपट बाद करून शानदार सुरुवात केली. यावेळी भारतीय गोलंदाज वर्चस्व गाजविणार असेच दिसत होते. मात्र, भारताविरुद्ध हमखास यशस्वी ठरणाऱ्या स्मिथने सर्व सूत्रे आपल्या हाती घेताना मार्शसह संघाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाज वैयक्तिक शतके झळकावून निवृत्त झाले.स्मिथने १६१ चेंडंूत १२ चौकार आणि एका षट्कारासह १०७ धावांची खेळी केली. तसेच, मार्शने १७३ चेंडंूत ११ चौकार व एका षट्कारासह १०४ धावांची खेळी करून मैदान सोडले. भारतीय गोलंदाज स्मिथ - मार्श यांची कोंडी करण्यात सपशेल अपयशी ठरले. फिरकी मारा चमकदार ठरेल, अशी आशा होती. परंतु, या दोन्ही फलंदाजांनी समर्थपणे फिरकी गोलंदाजी खेळून काढली. आपला शंभरावा प्रथम श्रेणी सामना खेळताना स्मिथने ३०वे प्रथम श्रेणी शतक झळकाविले. शतक पूर्ण झाल्यानंतर त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कमजोर क्षेत्ररक्षणाचा फटकाही भारत ‘अ’ संघाला बसला. पार्ट टाईम स्पिनर अखिल हेरवाडकरच्या गोलंदाजीवर मार्शचा पूल करण्याचा प्रयत्न चुकला. मात्र, नवदीप सैनी मिडविकेटला त्याचा झेल घेण्यात अपयशी ठरला. त्यावेळी मार्श ८८ धावांवर खेळत होता. दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गोथमला मैदानाबाहेर जावे लागले. यामुळे भारतीय फिरकी माऱ्याला मोठा धक्का बसला. त्याचवेळी, दिवसाअखेर त्याने दोन षटके टाकून आपली तंदुरुस्ती आजमावली. त्याचप्रमाणे, पीटर हँड्सकॉम्बने ७० चेंडूंत ३ चौकारांसह ४६ धावा काढल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मिशेल मार्श (नाबाद १६) आणि मॅथ्यू वेड (नाबाद ७) खेळपट्टीवर होते. भारताकडून नवदीप सैनीने २७ धावांत २ बळी घेतले, तर कर्णधार पंड्याला एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलकआॅस्टे्रलिया (पहिला डाव) : डेव्हीड वॉर्नर झे. इशान किशन गो. सैनी २५, मॅट रेनशॉ झे. किशन गो. सैनी ११, स्टीव्ह स्मिथ निवृत्त १०७, शॉन मार्श निवृत्त १०४, पीटर हँड्सकॉम्ब झे. पांचाळ गो. पंड्या ४५, मिशेल मार्श खेळत आहे १६, मॅथ्यू वेड खेळत आहे ७. अवांतर - १२. एकूण : ९० षटकांत ५ बाद ३२७ धावा. गोलंदाजी : अशोक दिंडा १५. २-१-४९-०; हार्दिक पंड्या १७-३-६४-१; नवदीप सैनी १२.४-४-२७-२; शाहबाज नदीम २३-०-९०-०; अखिल हेरवाडकर ११-०-४८-०; श्रेयश अय्यर ७-०-३२-०; प्रियांक पांचाळ ४-०-११-०.आत्मविश्वास मिळालाच्खेळपट्टीवर जास्त वेळ घालविल्याचा आनंद आहे. हा अनुभव खूप मोलाचा असून, यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासासह भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत खेळेल, अशी प्रतिक्रिया आॅस्टे्रलियाचा फलंदाज शॉर्न मार्शने व्यक्त केली. मार्शने भारत ‘अ’ विरुद्धच्या सराव सामान्यात शानदार शतक झळकावून चांगली सुरुवात केली आहे.च्मार्श म्हणाला की, ‘जेव्हा पण खेळपट्टीवर जास्त वेळ घालवला जातो, तेव्हा फलंदाजाला नेहमी फायदा होतो. भारताविरुद्ध आश्विन आणि जडेजाकडून कोणत्या प्रकारचा मारा होणार याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे फलंदाज म्हणून या सराव सामन्यात जास्तीत जास्त फलंदाजीचा सराव करून भारताविरुद्ध् आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील.’ त्याचप्रमाणे, ‘सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी आमच्या प्रत्येक खेळाडूने काहीतरी अनुभव मिळवला आहे. पुढील दोन दिवशी कामगिरीत सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच या जोरावर पुढील आठवड्यापासून सुरूहोणाऱ्या कसोटी मालिकेत आम्ही चमकदार कामगिरी करू,’ असेही मार्शने म्हटले. वॉर्नरला बाऊंसरवर बाद करण्याचा अनुभव खूप मोलाचा आहे. डिंडाच्या आखूड टप्प्यावर वॉर्नरला पूल करताना पाहिले, तेव्हा पुन्हा त्याला पूल मारण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी करण्याचा विचार केला. मी चेंडूला अधिक उसळी देण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे. गोलंदाजी करताना सुरुवातीला मी नर्वस होतो. परंतु, नंतर आत्मविश्वास थोडा वाढल्यानंतर मी अचूक मारा करण्यात यशस्वी ठरलो.- नवदीप सैनी, मध्यमगती गोलंदाज