ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. ३० : भारताचा पहिला वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव याने ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीचा शुभारंभ घंटा वाजवून केला.ईडन गार्डनवर एक मोठी चांदीच्या रंगाची घंटा बसवण्यात आली असून, कसोटी सामन्याची सुरुवात दररोज सकाळी ही घंटा वाजवून करण्यात येणार आहे. ही परंपरा प्रथमच सुरुवात करण्यात आली आणि त्यात सर्वात आधी घंटा वाजवून सामना सुरू करण्याचा सन्मान माजी कर्णधार कपिलदेवला देण्यात आला. भारतीय भूमीवर हा २५0 वा कसोटी सामना असल्यामुळे या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. कॅबचे संयुक्त सचिव अभिषेक दालमिया यांनी म्हटले, ह्यही सौरभ गांगुलीची योजना होती आणि त्याने कपिलला यासाठी निमंत्रण दिले आणि हे निमंत्रण या माजी कर्णधाराने स्वीकारले.ह्ण विशेष म्हणजे ही परंपरा २00७ मध्ये लंडनच्या ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावरदेखील सुरू करण्यात आली होती.