मुंबई - भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पुन्हा एकदा मायभूमीवर तिरंगा फडकवला. या युद्धात भारतीय सैन्याच्या 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. क्रीडा विश्वातूनही शहिदांना मानवंदना देण्यात आहे. भारताचे माजी कसोटीपटू विरेंद्र सेहवाग आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासह 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगनेही श्रद्धांजली अर्पण केली.
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 9:57 AM