ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 22 - कोलकाता वनडेत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत इंग्लंडने पाच धावांनी विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. तीन सामन्यांत 230 धावा ठोकणाऱ्या केदारला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. केदार जाधवने मालिकेत दबावाखाली खेळून चांगली फलंदाजी केली. पुण्यातील पहिल्या सामन्यात केदारने 120 धावांची खेळी केली होती. तर कटक येथे रंगलेल्या दुसऱ्य़ा एकदिवसीय सामन्यात त्याने अखेरच्या क्षणी 9 चेडूत 22 धावा केल्या होत्या. आजच्या तिसऱ्या सामन्यात केदारने एकाकी झुंज देताना 75 चेंडूत 90 धावांची खेळी केली.तिसऱ्या सामन्यात आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर केदारने हार्दिक पांड्याच्या साथीने विजय खेचून आणला होता. पण मोक्याच्या क्षणी बेन स्टोकने विकट घेत भारताचा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या स्टोकला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. स्टोकने फलंदाजी करताना नाबाद 57 धावांची खेळी केली होती. तर गोलंदाजी करताना कोहली, अश्विन आणि हार्दिक पांड्याला बाद करत सामन्यात रंगत आणली होती. 26 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड दरम्यान टी-20 च्या मालिकेला सुरूवात होत आहे.
केदार जाधव मालिकावीर पुरस्काराने सन्मानित
By admin | Published: January 22, 2017 10:20 PM