शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
2
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
3
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
4
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
5
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
6
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
7
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
8
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
9
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
10
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
11
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
12
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान
13
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
14
पुढचा गिल, जैस्वाल, बुमराह तुमच्यापैकीच; रोहित शर्माचा कर्जत जामखेडमध्ये मराठीतून संवाद
15
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
16
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
17
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
18
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
19
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

केनची विक्रमी खेळी

By admin | Published: October 21, 2016 1:12 AM

केन विलियम्सनची न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवण्याची संधी केवळ तीन धावांनी हुकली असली, तरी तो कर्णधार म्हणून ग्लेन

नवी दिल्ली : केन विलियम्सनची न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवण्याची संधी केवळ तीन धावांनी हुकली असली, तरी तो कर्णधार म्हणून ग्लेन टर्नरचा ४१ वर्षे जुना विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला. विलियम्सनने ११८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध ही दुसरी वैयक्तिक सर्वोच्च खेळी ठरली. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नॅथन अ‍ॅस्टलच्या नावावर आहे. त्याने नोव्हेंबर १९९९ मध्ये राजकोट येथे १२० धावांची खेळी केली होती. विलियम्सन भारताविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा किवी कर्णधार ठरला आहे. त्याने टर्नरचा १४ जून १९७५ रोडी मॅन्चेस्टर येथे केलेल्या ११४ धावांच्या खेळीचा विक्रम मोडला. न्यूझीलंडतर्फे विद्यमान मालिकेत प्रथमच एखादा फलंदाज तिहेरी धावसंख्या नोंदवण्यात यशस्वी ठरला. विलियम्सची वन-डे क्रिकेटमधील आठवी शतकी खेळी आहे. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विलियम्सन स्टिफन फ्लेमिंगसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी दाखल झाला आहे. अ‍ॅस्टलने न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक १६ शतके झळकावली आहेत. विलियम्सनने आज झळकावलेले शतक न्यूझीलंडतर्फे भारताविरुद्ध किवी फलंजाने झळकावलेले एकूण १७ वे शतक आहे. विलियम्सनने कसोटी कारकिर्दीची सुरुवात भारताविरुद्ध केली होती आणि अहमदाबादमध्ये नोव्हेंबर २०१० मध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत त्याने पहिल्या डावात १३१ धावांची खेळी केली होती. पण, भारताविरुद्ध वन-डेमध्ये त्याला पहिले शतक झळकावण्यासाठी सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या कालावधीत तो १२ सामने खेळला. २०१४ मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये त्याने प्रत्येक लढतीत अर्धशतकी खेळी केली होती. त्यात वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या ८८ धावांच्या खेळीचा समावेश आहे. यापूर्वी भारताविरुद्ध ही त्याची सर्वोच्च खेळी होती. गेल्या काही दिवसांपासून विलियम्सन वन-डेमध्ये शतक झळकावण्यासाठी संघर्ष करीत होता. त्याने १६ सामन्यांनंतर प्रथमच शतक झळकावले. दरम्यान, या कालावधीत तो तीनदा ‘नर्व्हस नाइंटिज’चा बळी ठरला. (वृत्तसंस्था)