शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

खोडा, परांजपेंना पद सोडावे लागणार

By admin | Published: January 04, 2017 3:20 AM

सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्यांच्या संख्येमध्ये कपात होणार असल्याचे निश्चित आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्यांच्या संख्येमध्ये कपात होणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे गगन खोडा आणि जतीन परांजपे यांना आपले पद सोडावे लागणार आहे. कारण ते निकषांची पूर्तता करीत नाहीत.लोढा समितीच्या शिफारशीनुसार सिनिअर निवड समिती तीन सदस्यांची असायला हवी. त्यात सर्व कसोटीपटूंचा समावेश असणे आवश्यक आहे. बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये निवड समितीची घोषणा केली त्यावेळी निलंबित अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांनी लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले होते. कारण सर्वोच्च न्यायालयाने तोपर्यंत आपला अंतिम निर्णय दिलेला नव्हता. नव्या समितीचा कुठलाही अधिकृत करार झालेला नव्हता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वन-डे व टी-२० मालिकेसाठी एमएसके प्रसाद, देवांग गांधी आणि शरणजित सिंग संघाची निवड करतील. हे सर्व माजी कसोटीपटू आहेत. संघाची निवड ५ जानेवारी रोजी होईल. लोढा समितीच्या अटींनुसार बीसीसीआयच्या सिनिअर निवड समितीमध्ये केवळ कसोटीपटूंचा समावेश असणे आवश्यक आहे. खोडाने दोन वन-डे तर परांजपेने चार वन-डे खेळल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या समितीने ठरविलेल्या अटींची पूर्तता होत नाही. बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मते खोडा व परांजपे यांनी आतापर्यंत जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळे त्यांना प्रतिभा समन्वयकाची जबाबदारी मिळू शकते. त्यासाठी कसोटी क्रिकेटपटू असणे आवश्यक नसून, खोडा व परांजपे यामध्ये फिट बसतात. (वृत्तसंस्था)