शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

‘खाशाबांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिवस’, पुरस्काराच्या रकमेतही भरघोस वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:34 IST

क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत एक लाखावरून तीन लाख आणि जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत तीन लाखांवरून पाच लाख रुपये अशी वाढ करण्याचीही घोषणा त्यांनी केली.

पुणे : ‘देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस १५ जानेवारी हा यापुढे राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्यात केली. तसेच क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत एक लाखावरून तीन लाख आणि जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत तीन लाखांवरून पाच लाख रुपये अशी वाढ करण्याचीही घोषणा त्यांनी केली.

क्रीडा पुरस्काराच्या रकमेत झालेली वाढ यंदापासून लागू करण्यात आली असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर दोन कोटी ३८ लाखांचा भार पडणार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, म्हाळुंगे येथे सोमवारी क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.अनेक बॅडमिंटनपटू घडवणारे श्रीकांत लाड, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी ॲथलिट अदिल सुमारीवाला जागतिक स्पर्धेसाठी बुडापेस्ट येथे गेल्याने जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित राहू शकले नाहीत. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांत खेळाडूंना सर्व पातळ्यांवर मदत, साहाय्य केल्याने राज्यातील खेळाडूंची कामगिरी सुधारली आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चमकावेत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खेळाडूंसाठी कितीही पैसे खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. केवळ खेळाडूंनी शानदार कामगिरी करावी.’ राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, ‘लहान मुले स्मार्ट फोनच्या आहारी गेल्यामुळे मैदानांपासून दुरावली आहेत. त्यांना पुन्हा मैदानांकडे घेऊन जाण्याची गरज आहे. तसेच राज्यात देशी खेळांना प्राधान्य देण्याची गरज आहे.’ 

शिवरायांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार संस्मरणीय आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक सन्मान मिळाले, पण हा पुरस्कार कायम जवळचा वाटेल. - दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू

आजपर्यंत घडवलेल्या अनेक खेळाडूंमुळे माझा हा सन्मान झाला. शेवटच्या श्वासापर्यंत शक्य तितक्या खेळाडूंना शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन. हा पुरस्कार मोलाचा आहे.- श्रीकांत लाड, बॅडमिंटन प्रशिक्षक

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे