शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
5
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
6
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
8
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
9
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
11
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
12
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
13
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
14
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
17
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
18
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
19
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
20
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची दिमाखदार सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:32 PM

महाराष्ट्राने तामिळनाडूचा १६-९ असा एक डाव ७ गुणांनी धुव्वा उडविला.

गुवाहटी : सुवर्णपदकांसाठी हुकमी खेळ मानल्या गेलेल्या खो-खो मध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राने एकतर्फी विजयासह दिमाखदार सलामी केली. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा १६-९ असा एक डाव ७ गुणांनी धुव्वा उडविला. १७ वर्षाखालील मुलांमध्ये आंध्रप्रदेशवर १६-५ असा दणदणीत विजय मिळविला.

   

मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राकडून निहार दुबळे (अडीच मिनिटे व ३ गडी), प्रद्युम्न पाटील (२ मिनिटे व ४ गडी) व संकेत कदम (नाबाद २ मिनिटे व ३ गडी) यांनी महत्त्वाची कामगिरी केली. तामिळनाडूकडून जयेशकुमार याने दोन गडी बाद करीत एकाकी झुंज दिली.

    मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या विजयात चंदू चावरे (२ मिनिटे ४० सेकंद व २ गडी), रामजी कश्यप (२ मिनिटे २५ सेकंद व २ गडी) व सौरव अहिर (एक मिनिट ३५ सेकंद व एक गडी) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला. आंध्रप्रदेशने दुसºया डावात साडेतीन मिनिटे झाल्यानंतर सामना सोडून दिला. त्यांच्याकडून के.कन्नन नायडू ( एक मिनिट २० सेकंद व एक मिनिट १० सेकंद) याचे प्रयत्न अपुरे ठरले.

    मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने ओडिशाचा ९-७ असा एक डाव दोन गुणांनी पराभव केला. त्यामध्ये प्रियांका भोपी (साडे पाच मिनिटे) हिने पळतीचा खेळ केला. तर, काजल भोर हिने (दोन मिनिटे व २ गुण) असा अष्टपैलू खेळ केला. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने केरळचा १८-९ असा दणदणीत पराभव केला. त्यामध्ये दिक्षा सोमसूरकर हिने (दोन मिनिटे) पळतीचा खेळ केला. तसेच ६ गडी टिपले.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाKho-Khoखो-खोMaharashtraमहाराष्ट्र