नाशिक : विंटोजिनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन सहप्रायोजक एकता वर्ल्ड आणि अशोका यांच्या सहकार्याने आयोजित सर्वांत मोठ्या लोकमत हाफमहामॅरेथॉन स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी विजेता ठरला. एक तास नऊ मिनिटे आणि १२ सेकंदांची वेळ नोंदवत त्याने विजेतेपद पटकाविले, तर महिलांमधील नगरची पूजा राठोड प्रथम आली. दहा किलोमीटरमध्ये पुरुषांमध्ये गणेशगावचा दिनकर लिलके, तर महिलांमध्ये लातूरची पूजा श्रीडोळे विजेती ठरली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिकांसह चषक प्रदान करण्यात आला.गोल्फ क्लब मैदान येथून या महामॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी महापौर रंजना भानसी, लोकमत महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, विंटोजिनोचे एमडी प्रकाश उपाध्याय, एकता वर्ल्डचे प्रेसिडेंट (ब्रँड अँड कम्युनिकेशन) एम. विकास, अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया, अशोकाचे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि सीईओ संजय लोंढे, संदीप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन. रामचंद्रन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सकाळी ६.१५ वाजता २१ किलोमीटरच्या हाफमहामॅरेथॉनला मान्यवरांनी झेंडा दाखविला आणि धावपटूंनी २१ किलोमीटरसाठी धाव घेतली. गोल्फ क्लब ते हॉटेल संस्कृतीपर्यंत असलेल्या हाफमहामॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी धावपटूंचे विविध कलापथके आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत केले. अत्यंत उत्साहवर्धक आणि रंगारंग सोहळ्यात धावपटूंनी आंतरराष्टÑीय दर्जाच्या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव घेतला. १० किलोमीटर रनला सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली, तर त्यानंतर ६.४५ वाजता ५ व ६.५५ वाजता ३ किलोमीटरसाठी नाशिककरांनी धाव घेतली.व्यावसायिक धावपटू, नियमित सराव करणारे खेळाडू, तसेच आरोग्यविषयक जागरूक असलेले, तसेच ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि असंख्य बालकांनी जल्लोष करीत लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला.४० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक गटांचे निकाल : २१ किलोमीटर : पांडुरंग पाटील (०१:२५:११) प्रथम, हरिश्चंद्रा (०१:२६:११), कैलाश मंग (०१:२८:२९), तर महिलांमध्ये शोभा देसाई (०१:४९:३९), शीतल संगवई (०१:५३:२७), तर प्रतिभा नाडकर (०२:०३:४९) अशा वेळेची नोंद करीत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.१० किलोमीटरमध्ये रोमेश आबा (००:४१:४९), नंदू वाघुळे (००:४३:३९), भगवान कछाव (००:४५:१८), तर महिलांमध्ये सौ. कछाव (००:५९:३७), तर सुगंधा पाटील यांनी (०१:०३:३०) अशी वेळ नोंदवून विजेतेपद मिळविले, तर महिलांमध्ये ब्युला मंडल (००:५९:२४), विठुबाई कछाव (००:५९:३७), तर शुभदा पाटील (०१:०३:३०) अशी वेळ नोंदवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.डिफेन्स गट : २१ किलोमीटर : दशरथ पाटील (०१:२१:३३), जिनो अॅन्टोनी (०१:२५:४७), पंकज कुºहाडे (०१:३५:५२) यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.डिफेन्स महिला गटात : योगिता वाघ प्रथम (०१:४४:३७), अश्विनी देवरे द्वितीय (०२:००:०२), मीना चौधरी, तृतीय (०२:०४:५८) यांनी आपापल्या गटात मॅरेथॉन जिंकली.>हजारो स्पर्धकांचा सहभाग२१ किलोमीटर खुल्या गटामध्ये किसन तडवी (एक तास नऊ मिनिटे १२ सेकंद), पुकेश्वर लाल (एक तास नऊ मिनिटे २७ सेकंद), तर कांतिलाल कुंभार (एक तास १० मिनिटे ४२ सेकंद) यांनी अशी वेळ नोंदवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.२१ किलोमीटर महिलांमध्ये पूजा राठोड हिने एक तास ३१ मिनिट ४१ सेकंद अशी वेळ नोदवून विजेतपद पटकाविले, तर निवृत्ता दहावड हिने (एक तास ३१ मिनिटे ४६ सेकंद) अशी वेळ नोंदवून द्वितीय, तर श्रृती पांडे हिने (एक तास ४९ मिनिट ०४ सेकंद) वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळविला. १० किलोमीटरमध्ये दिनकर लिलके (३३ मिनिट ३७ सेकंद), गणेश भोंबे (३४ मिनिट ३५ सेकंद) आणि सतीश वाघचौरे (३६ मिनिट ४२ सेकंद) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविा, तर याच गटात महिलांमध्ये पूजा श्रीडोळे (४१ मिनिट ३८ सेकंद), नंदिनी पवार (४५ मिनिट ३६ सेकंद), पूनम वाणी(५६ मिनिट ०७) सेकंदाची वेळ नोंदवतअनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने मॅरेथॉन जिंकली.
नाशिकचा किसन तडवी महामॅरेथॉन विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 3:34 AM