शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

किवी एक्स्प्रेस सुसाट

By admin | Published: March 19, 2016 2:02 AM

न्यूझीलंडने शुक्रवारी खेळेलेल्या लढतीत आंतर टास्मानिया प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव केला आणि टी-२० विश्वकप स्पर्धेत प्रबळ दावेदारांमध्ये स्थान मिळविले.

धरमशाला : न्यूझीलंडने शुक्रवारी खेळेलेल्या लढतीत आंतर टास्मानिया प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव केला आणि टी-२० विश्वकप स्पर्धेत प्रबळ दावेदारांमध्ये स्थान मिळविले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना न्यूझीलंडने २० षटकांत ८ बाद १४२ धावांची मजल मारली. आॅस्ट्रेलियाचा डाव ९ बाद १३४ धावांत रोखला गेला. आॅस्ट्रेलियाला सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला, तर पहिल्या लढतीत यजमान व प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला ४७ धावांनी पराभूत करणाऱ्या किवी संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडतर्फे सलामीवीर मार्टिन गुप्तीलने आक्रमक खेळी करताना २७ चेंडूंमध्ये दोन चौकार व चार षट्कारांच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली. कर्णधार केन विलियम्सनने २० चेंडूंमध्ये २४ धावांचे योगदान दिले. या दोघांनी सलामीला ६१ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियातर्फे जेम्स फॉकनेर व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी तीन षटकांत प्रत्येकी १८ धावा बहाल करताना प्रत्येकी दोन बळी घेतले. आॅस्ट्रेलिया संघाने सहाव्या षटकात मिशेल मॅक्लीनागनने अनुभवी शेन वॉटसनला माघारी परविले. त्यावेळी धावसंख्या ४४ होती. त्यानंतर सात धावांची भर पडली असता कर्णधार स्टीव्हन स्मिथ (६) बाद झाला. डेव्हिड वॉर्नर (६) सॅन्टरनचा दुसरा बळी ठरला. आॅस्ट्रेलियातर्फे सलामीवीर उस्मान ख्वाजाचा (३८ धावा, २७ चेंडू, ६ चौकार) अपवाद वगळता अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. (वृत्तसंस्था)धावफलकन्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल झे. मॅक्सवेल गो. फॉकनर ३९, केन विलियम्सन झे. एगर गो. मॅक्सवेल २४, कोलिन मुन्रो झे. फॉकनर गो. मार्श २३, कोरी अ‍ॅन्डरसन झे. एगर गो. मॅक्सवेल ०३, रॉस टेलर झे. मार्श गो. वॉटसन ११, ग्रॅन्टा इलियट धावबाद २७, ल्युक रोंची झे. मॅक्सवेल गो. फॉकनर ०६, मिशेल सॅन्टनर धावबाद ०१, अ‍ॅडम मिलने नाबाद ०२. अवांतर (६). एकूण २० षटकांत ८ बाद १४२. बाद क्रम : १-६१, २-६६, ३-७६, ४-९७, ५-११७, ६-१३३, ७-१४०, ८-१४२. गोलंदाजी : कोल्टर नील ४-०-३३-०, वॉटसन ४-०-२२-१, एगर १-०-१८-०, फॉकनर ३-०-१८-२, जाम्पा १-०-३-०, मॅक्सवेल ३-०-१८-२, मार्श ४-०-२६-१. आॅस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा धावबाद ३८, शेन वॉटसन झे. विलियम्सन गो. मॅक्लीनागन १३, स्टीव्हन स्मिथ यष्टिचित रोंची गो. सॅन्टनर ०६, डेव्हिड वॉर्नर झे. गुप्तिल गो. सॅन्टनर ०६, ग्लेन मॅक्सवेल झे. विलियम्सन गो. सोढी २२, मिशेल मार्श झे. मिलने गो. मॅक्लीनागन २४, एश्टन एगर झे. टेलर गो. मॅक्लीनागन ०९, जेम्स फॉकनर झे. गुप्तिल गो. अ‍ॅन्डरसन ०२, नॅथन कोल्टर नील गो. अ‍ॅन्डरसन ०१, पीटर नेव्हिल नाबाद ०७, अ‍ॅडम जम्पा नाबाद ०२. अवांतर (०४). एकूण २० षटकांत ९ बाद १३४. बाद क्रम : १-४४, २-५१, ३-६२, ४-६६, ५-१००, ६-१२१, ७-१२३, ८-१२४, ९-१३२. गोलंदाजी : अ‍ॅन्डरसन ४-०-२९-२, मिलने २-०-२२-०, इलियट २-०-१७-०, मॅक्लीनागन ३-०-१७-३, सॅन्टनर ४-०-३०-२, विलियम्सन १-०-३-०, सोढी ४-०-१४-१.