शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

महाराष्ट्राने जेतेपद कायम राखले; तेलंगना जलतरणपटू वृत्ती अगरवालने जिंकले ५ सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 9:33 PM

सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्राने जेतेपद कायम राखले.

चेन्नई, ३१ जानेवारी २०२४ : सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्राने जेतेपद कायम राखले. पुन्हा एकदा महाराष्ट्राने त्यांचे वर्चस्व सिद्ध केले. तेलंगणाच्या वृत्ती अगरवालने जलतरणात पाच सुवर्णपदक जिंकून स्पर्धा संपवली. 

महाराष्ट्राचा जलतरणपटू ऋषभ दासने प्रथम मुलांच्या ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या पदकात भर घातली. महाराष्ट्राने या स्पर्धेत एकूण १५६ पदकं जिंकली. त्यात ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्यपदकांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावरील तामिळनाडूने शेवटच्या दिवशी तीन सुवर्णपदकं जिंकली. त्यांनी या स्पर्धेत ३८ सुवर्ण, २१ रौप्य व ३९ कांस्यपदकांसह स्पर्धेचा निरोप घेतला. खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या इतिहातील ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.  

हरयाणा प्रथमच अव्वल-दोन स्थानांवरून घसरला आणि ३५ सुवर्ण, २२ रौप्य आणि ४६ कांस्यपदकांसह तिसरे स्थान पटकावले. दिल्ली ( १३ सुवर्ण, १८ रौप्य व २५ कांस्य )ने राजस्थानला ( १३ सुवर्ण, १७ रौप्य व १७ कांस्य ) मागे टाकले.  

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी फक्त फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस आणि जलतरण या खेळांत चुरस रंगली.  कोणता जलतरणपटू खेळातील सर्वात यशस्वी ऍथलीट होण्याचा दावा करेल हे पाहण्यासाठी SDAT एक्वाटिक कॉम्प्लेक्समध्ये सर्वांचे लक्ष लागले होते आणि वृत्तीने पाचही गटात सुवर्णपदकांवर दावा सांगितला. बुधवारी, तिने २:२२.८९ सेकंदाच्या वेळेसह २००मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक जिंकले. ती दुसऱ्या स्थानावर असलेल्या कर्नाटकच्या ऋतिका महेश बंगळुरूच्या जवळपास चार सेकंद पुढे होती. 

२०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १७ वर्षीय मुलीने १७:५९.५१ सेकंदांच्या वेळेसह १५०० मीटर फ्रीस्टाईल गटाचे मुकुट जिंकले. कर्नाटकच्या अदिती मुळेने ( १८:१२.७७ सेकंद) आणि श्री चरणी तुमू ( १८:१७.८५ सेकंद) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. 

राजस्थानच्या युग चेलानीलाही पाच सुवर्णपदकांसह पूर्ण करण्याची संधी होती, परंतु मुलांच्या २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत कर्नाटकच्या एस धनुषने त्याला मागे टाकले. त्यामुळे युगला चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकता आले.

SDAT टेनिस संकुलात, तामिळनाडूच्या रेथिन प्रणव आरएस आणि एमआर रेवती यांनी आरामात सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या अंतिम फेरीत प्रणवचा प्रतिस्पर्धी महाराष्ट्राच्या काहिर वारिकने ६-२,  ३-० अशी पिछाडीवर असताना निवृत्ती पत्करली, तर मुलींच्या अंतिम फेरीत रेवतीने तेलंगणाच्या लक्ष्मी सिरी दांडूचा ६-१, ६-३ असा पराभव केला. प्रणव आणि रेवतीने मंगळवारी मुला-मुलींच्या दुहेरीत आपापल्या जोडीदारांसह सुवर्णपदक जिंकले.