ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ८ -
आयपीएलचा पहिला सामना केकेआरने खिशात घातला आहे. मुबई इंडिन्सचे १६८ धावांचे आव्हान कोलकाता नाईट रायडरने १८ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले.
१८ षटकांत ३ गडी गमावत केकेआरने १७० धावा केल्या व आयपीएलचा पहिल्या सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली. रॉबिन उथप्पा अवघ्या नऊ धावांवर बाद झाल्यानंतर गौतम गंभीरच्या फलंदाजीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ७ चौकार व एक षटकार लगावत गौतम गंभीरने ५७ धावा केल्या परंतू, बुराहच्या गोलंदाजीवर खेळत असताना रायडूकडे झेल गेल्याने त्याला तंबूत परतावे लागले. तसेच, मनिष पांडेने २४ चेंडूमध्ये ३ षटकार व २ चौकार लगावत ४० धावा केल्या. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर खेळताना पोलार्डकेड झेल गेल्याने पांडे बाद झाल्यावर सुर्यकुमार यादव व युसुफ पठाण यांनी तडाखेबंद फलंदाजी करत सामना सहजपणे जिंकला. सुर्यकुमार यादवने या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ५ षटकार लगावले. तर फिंच व रायडु यांना बाद करणा-या मोर्ने मोरकेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.