कोलकाता : सलग ३ पराभवांनंतर अव्वल स्थान गमावणाऱ्या गुजरात लायन्सला आयपीएल-९ मध्ये उद्या (रविवारी) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजयासाठी प्राण पणाला लावण्याचे आव्हान असेल. पहिल्यांदा आयपीएल खेळत असलेल्या गुजरातने सुरुवातीच्या सामन्यात पाठोपाठ विजय नोंदवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. काल रात्री मात्र हैदराबादकडून पराभूत होताच गुजरात संघ जमिनीवर आला. केकेआर संघ गुजरातविरुद्ध खेळताना कुठलीही दया दाखविणार नाही, हे स्पष्ट आहे. तिसऱ्या जेतेपदावर डोळा राखणारा केकेआर संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अन्य संघ विदेशी खेळाडूंवर विसंबून असताना केकेआरने मनीष पांडे, सूर्यकुमार यादव यांच्यावर विश्वास टाकला. आंद्रे रसेल हा ‘डेथ ओव्हर्स’मध्ये प्रभावी ठरला आहे. सुनील नारायण मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. गुजरातचा कर्णधार सुरेश रैना याच्यावर नेतृत्वाचे ओझे जड झालेले दिसते. संघातील महत्त्वाचे खेळाडू ब्रँडन मॅक्युलम, अॅरोन फिंच आणि ड्वेन स्मिथ हे त्रिकूट संघासाठी लाभदायी ठरत असताना रैनाची कामगिरी मात्र ढेपाळली. (वृत्तसंस्था) उभय संघ यातून निवडणारकोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज, जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, अमित मिश्रा, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.
लायन्सपुढे केकेआरचे आव्हान
By admin | Published: May 08, 2016 3:15 AM