ऑनलाइन लोकमत कोलकाता, दि. ११ - कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात बंगळुरु संघाने कोलकाता संघावर ३ गडी राखून विजय मिळवला. ख्रिस गेलने ५६ चेंडूत केलेल्या ९६ धावांच्या जोरावर बंगळुरू संघाला हा विजय साकारता आला. कोलकाताने बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान ठेवले आहे. बंगळुरूकडून खेळणारा ख्रिस गेलच्या खेळीकडे अनेकांच्या लक्ष लागले होते. कोलकातावर आक्रमक फलंदाजी करीत ख्रिस गेलने आपले वादळ दाखवून दिले. टॉस जिंकणा-या बंगळुरू संघाच्या कर्णधाराने कोलकाताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. कोलकाताची सुरुवात चांगली झाली पण त्यानंतर कोलकाताचा डाव गडगडला. कोलकाताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक ५८ धावा केल्या. रॉबिन उथप्पा ३५, मनीष पांडे २३, सूर्यकुमार यादव ११ धावांवर बाद झाले. कोलकाताचा डाव १५० धावांच्या आत आटोपणार की काय असे वाटत असतानाच रसेलने आक्रमक फलंदाजी केली. रसेलने केलेल्या अवघ्या १७ चेंडूत नाबाद ४१ धावांच्या जोरावर कोलाकाताने ६ बाद १७७ धावा करता आल्या होत्या. बंगळुरू संघानं हे आव्हान ७ गडी गमावत १९ षटकांत पूर्ण केले.
ख्रिस गेलच्या झंझावातापुढे केकेआरचा पराभव
By admin | Published: April 11, 2015 11:30 PM