राजकोट : स्थानिक फलंदाजांवर विसंबून असलेला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आयपीएलच्या दहाव्या पर्वात सलामीचा सामना आज शुक्रवारी गुजरात लायन्सविरुद्ध खेळणार आहे. गुजरात संघात विदेशी फलंदाजांचा भरणा असल्याने ही लढत देशीविरुद्ध विदेशी फलंदाजांमधील चढाओढ, अशी मानली जाते.सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील लायन्सने गतवर्षी पदार्पणात साखळी फेरीत अव्वल स्थान पटकविले होते. पण, पात्रता फेरीत माघारल्याने तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ आघाडीच्या चार संघांत स्थान टिकविण्यात यशस्वी ठरला. गुजरातच्या फलंदाजी फळीत ब्रँडन मॅक्यूलम, ड्वेन स्मिथ, अॅरोन फिंच आणि रैना यांचा समावेश आहे. तिघांनी गतवर्षी ३०० वर धावा केल्या. दिनेश कार्तिक, ईशांत किशन आणि जेम्स फॉल्कनर हे बिग हिटर आहेत. जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो हे मात्र पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच खेळणार आहेत.गोलंदाजीत या संघाकडे धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, स्मिथ आणि फॉल्कनर, शादाब जकाती तसेच शिविल कौशिक यांचा पर्याय उपलब्ध असेल. केकेआरकडे फलंदाजीसाठी गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, इशांक जग्गी, युसूफ पठाण तसेच अष्टपैलू शाकिब अल हसन हे सरस खेळाडू आहेत. विंडीजचा बंदी असेला खेळाडू आंद्रे रसेल याची मात्र उणीव जाणवेल. कॅरेबियन फिरकी गोलंदाज सुनील नारायण हा मात्र संघासाठी उपयुक्त खेळाडू ठरू शकतो. (वृत्तसंस्था)
केकेआर-गुजरात लायन्सदरम्यान आज लढत
By admin | Published: April 07, 2017 3:46 AM