- रवी शास्त्री - पुण्याचा संघ अनेकबाबतीत वरचढ आहे. अजिंक्य रहाणेला गेल्या काही महिन्यांमध्ये बरेच काही करावे लागत आहे. एम. एस. धोनीला आपल्या क्षमतेच्या तुलनेत फार कमी चाहत्यांपुढे सादर करता आले. फाफ डु प्लेसिसचा तर वापरच झालेला नाही. यानंतरही पुणे संघ प्लेआॅफच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पुणे असा संघ आहे, की त्यात समावेश असलेल्या सुपरस्टार खेळाडूंनी किमान एकदा तरी छाप उमटवली आहे. स्टीव्ह स्मिथने सुरुवातीला हा पराक्रम केला. धोनीने आपल्यातील फिनिशरची प्रचिती दाखविली. बेन स्टोक्सने लिलावामध्ये त्यावर लावण्यात आलेली मोठ्या रकमेची बोली योग्य असल्याचे सिद्ध केले. या खेळाडूंची उपस्थिती राहुल त्रिपाठी व शार्दुल ठाकूर यांच्यासारख्या खेळाडूंवर मोठा प्रभाव पाडणारी आहे. संघाला आता सूर गवसला आहे. प्रत्येक लढतीगणिक त्यांच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या त्यांच्या लढतीबाबत उत्सुकता आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाने जास्तीत जास्त लढती घाम न गाळता जिंकलेल्या आहेत. पुणे संघ त्यांच्यापुढे कडवे आव्हान निर्माण करू शकतो. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने कोलकाताच्या गोलंदाजांची पिसे विखुरली. त्या लढतीत कोलकाता संघाने लय गमावल्याचे दिसून आले. त्यांच्या फिरकीपटूंना छाप पाडता आली नाही. कोलकाताविरुद्धच्या लढतीत पुणे संघाला इनोव्हेटी फटके खेळण्याची क्षमता असलेल्या फलंदाजाची गरज आहे. या फलंदाजांमध्ये कुठलेही दडपण न बाळगता रिव्हर्स हिट किंवा रिव्हर्स स्वीप मारण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. गंभीर आपल्या गोलंदाजांसाठी नेहमी आक्रमक क्षेत्ररक्षण सजवितो. वॉर्नरची आक्रमक फलंदाजी सुरू असतानाही गंभीरने बचावात्मक पवित्रा स्वीकारला नाही. पुणे संघाला हे आव्हान स्वीकारावे लागेल आणि जशास तसे उत्तर द्यावे लागेल. पुणे संघाने यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध दोनदा विजय मिळवला आहे. ईडनगार्डन्समध्ये मात्र त्याच्यापुढे मोठे आव्हान राहणार आहे.(टीसीएम)
केकेआरला पुण्याकडून आव्हानाची शक्यता
By admin | Published: May 03, 2017 12:33 AM