शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

केकेआर, पुणे संघांच्या लढवय्या वृत्तीला सलाम

By admin | Published: April 26, 2017 1:14 AM

लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवणे सोपे असते, हे जाणकारांचे मत आयपीएलमध्ये दोन संघांनी चुकीचे ठरविले आहे. त्यात एक संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स.

सुनील गावसकर लिहितात...लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवणे सोपे असते, हे जाणकारांचे मत आयपीएलमध्ये दोन संघांनी चुकीचे ठरविले आहे. त्यात एक संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अनपेक्षित विजय मिळवताना विश्वास असेल तर विपरीत परिस्थितीतही दिग्गज प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सरशी साधता येत असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर पुढच्याच दिवशी मुंबईमध्ये सुपरजायंट संघाने लढवय्या वृत्तीचा परिचय देताना मजबूत फलंदाजी असलेल्या यजमान संघाला साधारण धावसंख्येचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे नेतृत्व सौरभ गांगुलीने सांभाळले तेव्हापासून ईडनगार्डन्सची खेळपट्टी हिरवळ असलेली दिसू लागली. त्यामुळे आपल्या वेगवान माऱ्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास उत्सुक असलेल्या फलंदाजांना काही दाखविण्याची संधी उपलब्ध झाली. रविवारी झालेल्या तुरळक पावसानंतर चेंडू हवेमध्येच स्विंग होत होता, असे नाही तर खेळपट्टीवर पडल्यानंतर वेगाने उसळत होता. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी क्वचितच मिळते. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला परिस्थितीनुरूप फलंदाजी करता आली नाही, हे खेदाने नमूद करावे लागते. संपूर्ण संघाने केकेआरच्या गोलंदाजांपुढे गुडघे टेकविले. या शानदार विजयामुळे केकेआरने आपली सरासरीही सुधारली. सुपरजायंटने दिलेल्या लक्ष्याची मुंबई इंडियन्सला चिंता बाळगण्याची गरज नव्हती. मुंबई इंडियन्सची मजबूत फलंदाजी बघता या संघाने सहज विजय नोंदविणे अपेक्षित होते, घडले उलटेच. पुणे संघाच्या खेळाडूंनी मैदानावर लढवय्या बाणा दाखविताना यजमान संघापुढे कडवे आव्हान निर्माण केले. अखेर मुंबई संघाला थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. स्टोक्सने या लढतीत अखेरपर्यंत पुणे संघाचे आव्हान कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संघाच्या विजयासाठी सर्वकाही पणाला लावणारे स्टोक्ससारखे मोजकेच खेळाडू असतात. स्टोक्सने शानदार खेळ केला. पुणे संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने लांब दौड लगावताना धोकादायक ठरू पाहणाऱ्या पोलार्डचा झेल टिपला. यावरून या लढतीत सुपरजायंट संघ विजयासाठी सर्व काही झोकून देण्यास सज्ज असल्याचे दिसून आले. अशा संघांदरम्यानच्या लढतींमध्ये विजयासाठी संघर्ष बघण्याचा आनंद वेगळाच असतो. अशी रंगत अनुभवण्यासाठी नेहमी आतूर असतो, पण ईडनगार्डन्स व वानखेडे स्टेडियमप्रमाणे खेळपट्ट्याही नेहमी मिळणे महत्त्वाचे ठरते. (पीएमजी)