केकेआरला राजस्थानचे २०० धावांचे आव्हान वॉटसनचे नाबाद शतक
By admin | Published: May 18, 2015 1:16 AM
मुंबई : शेन वॉटसनने केलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर आयपीएल-८ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले. शेन वॉटसनने ५९ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या
मुंबई : शेन वॉटसनने केलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर आयपीएल-८ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले. शेन वॉटसनने ५९ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्याराजस्थान रॉयल्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली.अजिंक्य रहाणेे आणि शेन वॉटसन यांनी डावाची सरुवात केली. रहाणे याने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या सााने २२ चेंडूत ३७ धावा केल्या. दूसर्या बाजूने कर्णधार शेन वॉटसन जोरदार फटकेबाजी करत होता. मात्र अजिंक्य रहाणे (३७) धावबाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या पडझडीस सुरुवात झाली. स्मिथने १४ धावा केल्या. त्याला मॉर्कलने बाद केले. त्यानंतर आलेल्या संजू सॅम्पसन (८) व फॉल्कनर (६) यांना स्वस्तात बाद करत रसेलने राजस्थानची अवस्था ४ बाद १४० केली. एका बाजूने पडझड होत असताना कर्णधार वॉटसनने मात्र चौफेर टोलेबाजी सुरुच ठेवली होती. त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांच्या सााने नाबाद १०४ धावा केल्या. करुण नायरने तीन चौकाराच्या सााने १६ धावा केल्या. त्याला उमेश यादवने बाद केले. ख्रिस मॉरीसने नाबाद ४ धावा केल्या. राजस्थानने २० षटकात ६ विकेटच्या मोबदल्यात १९९ धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन बळी घेतले. उमेश यादवने १ बळी मिळवला................................................................................................................................संक्षिप्त धावफलकराजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे धावचित ३७, शेन वॉटसन नाबाद १०४, स्टीव्हन स्मिथ झे. मॉर्केल गो. रसेल १४, संजू सॅमसन झे. गंभीर गो. रसेल ८, फॉल्कनर झे. यादव गो. रसेल ६, कुलदिप नायर झे. उथ्थाप्पा गो. यादव १६, मॉरिस धावचित ४, अवांतर ६, एकूण २० षटकांत ६ बाद १९९.गडी बाद क्रम १-८०, २-११०, ३-१२२, ४-१४०, ५-१८०, ६-१९९, गोलंदाजी -अझर मेहमूद ३-०-४१-०मॉर्केल ४-०-३८-०उमेश यादव ४-०-३६-१शाकीब उल हसन ४-०-३६-०आंदे्र रसेल ४-०-३२-३पीयुष चावला १-०-१२-०