आॅनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 18 - पावसाच्या व्यत्ययानंतर केकेआरला ६ षटकांत ४८ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. केकेआरचा संघ हे देखील पूर्ण करु शकेल की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र गौतम गंभीरच्या संयमी ३२ धावांच्या खेळीने केकेआरने हा विजय साकारला. आणि गतविजेत्या संघाला स्पर्धेबाहेर केले. सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा सलामीवीर ख्रिस लीन ६ धावांवर बाद झाला. उथप्पा देखील लगेचच तंबूत परतला. गरज नसताना चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न युसुफ पठाणला नडला. केकेआरने ७ चेंडूत १२ धावा करून तीन गडीगमावले होते. त्यानंतर कर्णधार गौतम गंभीर याने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि १९ चेंडूत ३२ धावांची संयमी खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर केकेआरने हे लक्ष्य गाठले. पावसाच्या आधी उमेश यादव आणिनॅथन कुल्टर नाईल यांनी सनरायजर्सच्या फलंदाजांना त्रस्त केले होते.त्यांनी भेदक मारा करत हैदराबादला कमी धावसंख्येतच रोखले त्याचा फायदा त्यांना डकवर्थ लुईस नियमात झाला. हैदराबादची धावगती कमी असल्यानेच केकेआरला सोपे लक्ष्य मिळाले. कुल्टर नाईलने ३ तर यादवने २ गडी बाद केले.पावसाने सुमारे तीन तासांचा खेळ थांबवला. आजच्या सामन्यात अखेरचा ६ षटकांचा खेळ होऊ शकला नसता तर हैदराबादला विजेते घोषित करण्यात आले असते.मात्र गंभीर आणि केकेआरचे दैव बलवत्तर होते म्हणून अखेरच्या काही वेळात पाऊस थांबला मैदानही सामन्यासाठी सज्ज झाले. आणि सहा षटकांचा खेळ झाला.एलिमनेटर विजेत्या केकेआरचा सामना आता क्वालिफायर २ मध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात रायजींग पुणे सुपरजायंट्स सोबत लढेल.
गंभीर खेळीमुळे केकेआर विजयी
By admin | Published: May 18, 2017 2:15 AM