न्यूयॉर्क : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या १00 खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे. या यादीत फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे.कोहलीची प्रशंसा करताना फोर्ब्सने लिहिले की, या सुपरस्टारची तुलना चांगल्या कारणांमुळे आतापासूनच सर्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकरशी होत आहे. कोहली सातत्याने विक्रम मोडत आहे आणि २0१५ मध्ये त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार नेमले गेले. त्यात तो कर्णधारपदाची जबाबदारी पत्करणारा सर्वांत युवा खेळाडूंपैकी एक बनला आहे.या मॅग्झिननुसार कोहलीने गेल्या वर्षी राष्ट्रीय संघाकडून खेळताना वेतन आणि सामना शुल्क म्हणून १0 लाख डॉलर कमावले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मिळणाऱ्या २३ लाख डॉलरच्या वेतनामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंत समावेश आहे. त्याच्या कमाईचा मोठा भाग हा तथापि, प्रायोजकांशी केलेल्या करारातून येतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो एकूण ९ कोटी ३0 लाख डॉलरच्या कमाईसह अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेचा बास्केटबॉल स्टार लिब्रोन जेम्स आठ कोटी ६२ लाख डॉलरसह दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आठ कोटी डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. टेनिस स्टार रॉजर फेडरर सहा कोटी ४0 लाख डॉलरच्या कमाईसह चौथ्या स्थानावर आहे. तथापि, १00 अव्वल खेळाडूंच्या यादीत फक्त एकाच महिलेला स्थान मिळाले आहे. टेनिस स्टार सेरेना विलियम्स २ कोटी ७0 लाख रुपये कमाईसह या यादीत ५१ व्या क्रमांकावर आहे.(वृत्तसंस्था)>फोर्ब्सच्या २0१७ च्या ‘जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या’ यादीत २८ वर्षीय कोहली ८९ व्या स्थानावर आहे. त्याची एकूण कमाई २ कोटी २0 लाख डॉलर आहे. त्यात ३0 लाख डॉलर वेतन आणि पुरस्कार याशिवाय १ कोटी ९0 लाख डॉलर हे जाहिरातीपासून मिळालेल्या कमाईचा त्यात समावेश आहे.
फोर्ब्सच्या यादीत कोहली एकमेव भारतीय
By admin | Published: June 09, 2017 3:59 AM