शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:11 AM

भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले.

नेपियर : भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले. मार्टिन गुप्तिल आणि कोलिन मुन्रो यांची शमीने दांडी गुल केली. शमीने सहा षटकात केवळ १९ धावा देत तीन गडी टिपताच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. हे यश आपल्याला कर्णधार विराट कोहलीमुळे मिळाल्याची प्रतिक्रिया शमीने सामन्यानंतर व्यक्त केली.तो म्हणाला,‘ मी अनेक महिन्यानंतर पुनरागमन केले. दोन वर्षात दुखापतीने आणि इतर वादांमुळे थोडा त्रस्त होतो. दुखापतींमुळे खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सपोर्ट स्टाफनेही खूप सहकार्य केले. विशेष असे की विराटने सतत पुनरागमनासाठी प्रोत्साहन दिले. या बळावरच मी पुनरागमन करू शकलो.’आम्ही जे यश मिळवले ते सांघिक कामगिरीच्या जोरावरच. एकमेकांना सहकार्य केल्याने विजय मिळवणे शक्य झाले. ज्या योजना आखल्या होत्या त्यावर अमल केला. एखादी योजना फसली की आमच्याकडे दुसरा पर्याय तयार असतो. ’न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियातील मैदानांमध्ये फरक असल्याचे सांगून शमी पुढे म्हणाला,‘ आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट््या न्यूझीलंडसारख्याच होत्या, पण तेथील मैदाने मोठी होती आणि वातावरण उष्ण होते. येथे मात्र मैदाने लहान आहेत आणि वातावरण उबदार आहे. त्यामुळे वातावरणाशी एकरुप होत खेळणे भाग पडते.’

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीIndia VS New Zealandभारत विरुद्ध न्यूझीलंड