शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

कोहलीला विनाकारण टार्गेट केलं जातंय

By admin | Published: June 26, 2017 1:21 AM

अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे मीडिया व सोशल मीडियामध्ये लोकांच्या

हमीरपूर : अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे मीडिया व सोशल मीडियामध्ये लोकांच्या रोषाला सामोरे जात असलेल्या कर्णधार विराट कोहलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पाठराखण केली. कोहलीला विनाकारण टार्गेट करण्यात येत असून, भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य कोहलीच्या हाती सुरक्षित असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर टिष्ट्वट केले होते की, कर्णधाराचा माझ्या शैलीवर आणि मी प्रशिक्षकपदी कायम राहण्यावर आक्षेप होता.हिमाचल प्रदेश आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ठाकूर म्हणाले, ‘विराटला विनाकारण टार्गेट करण्यात येत आहे. माझ्या मते ही चर्चा आता थांबायला हवी. भारतीय क्रिकेटला आगामी १० वर्षे शिखरावर असल्याचे बघायचे असेल तर कोहलीमध्ये ती क्षमता आहे. असे प्रथमच घडलेले नाही. यापूर्वीही कर्णधार व माजी कर्णधारांना टार्गेट करण्यात आलेले आहे.’कुंबळे यांची गेल्या वर्षी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्षपद ठाकूर यांच्याकडे होते. बीसीसीआयने त्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशीनंतर कुंबळे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. आम्ही अशा बाबी बाहेर येऊ दिल्या नाहीत, असे सांगत ठाकूर यांनी बीसीसीआयच्या सध्याच्या पदाधिकाऱ्यांवर नेम साधला. कुंबळे यांच्यासोबत करार करण्यात आला त्यावेळी कुणी त्यावर आक्षेप नोंदवला नाही. ज्यावेळी आम्ही पदावर होतो त्यावेळी कुणी या दोघांमध्ये वाद असल्याचे म्हटले नव्हते. आज ज्या व्यक्ती बोर्डाचा कारभार बघत आहेत त्यांना असे का घडले, हा प्रश्न विचारायला हवा, असेही ठाकूर म्हणाले. (वृत्तसंस्था)