शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

कोहलीचं द्विशतक, भारताची ५०० धावांकडे वाटचाल

By admin | Published: October 09, 2016 10:35 AM

विराट कोहलीने आपल्या कारर्किदितील दुसरे दविशतक झळकावले आहे. भारतातर्फे असा पराक्रम करणारा कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे.

ऑनलाइन लोकमतइंदूर, दि. ९ : न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची दमदार फलंदाजी सुरूच आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने ३ बाद ४५१ अशी मजल मारली आहे. विराट कोहलीने आपल्या कारर्किदितील दुसरे द्विशतक झळकावले आहे. भारतातर्फे असा पराक्रम करणारा कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे.  कोहलीपाठोपाठ रहाणेनेदेखील १६० धावा पूर्ण केल्या आहेत. आणि त्याची द्विशतककडे वाटचाल सुरु आहे. कोहलीने १९ चौकार लगावत २०४ धावा केल्या. तर रहाणेने १४ चौकार आणि ४ षटकारांसह १६० धावा झळकावल्या आहेत. त्यामुळे भारताच्या ४५० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत.

विराट कोहली -रहाणेने अप्रतिम फलंदाजी केली. बचाव आणि आक्रमणाचा सुंदर ताळमेळ साधत रहाणेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कोहली आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी ३५३ धावांची भागिदारी रचली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी आतापर्यंत भारताकडून इतकी मोठी भागिदारी झाली नव्हती. तब्बल १०९ हून अधिक षटके कोहली आणि रहाणे मैदानात आहे. न्यूझीलंडच्या वेगवान आणि फिरकी माऱ्याचा समर्थपणे मुकाबला करत कोहली आणि रहाणेने भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. त्याआधी, भारताची ३६ षटकांत ३ बाद १०० अशी स्थिती होती.दरम्यान, दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करीत असलेल्या गौतम गंभीरने (२९) शानदार सुरुवात करताना मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर दोन षटकार लगावले, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. मुरली विजयला (१०) जीतन पटेलने झटपट माघारी परतले, तर चेतेश्वर पुजाराला (४१) मिशेल सँटेनरने तंबूचा मार्ग दाखवला. त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.