शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

कोहलीचं द्विशतक, भारताच्या 557 धावा

By admin | Published: October 09, 2016 7:04 PM

न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने संयमी खेळी केली.

ऑनलाइन लोकमत

इंदूर, दि. 9 - कर्णधार विराट कोहलीचे दुसरे द्विशतक आणि अजिंक्य रहाणेची कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ खेळी याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात विशाल धावसंख्या उभारली. भारताने पहिला डाव ५ बाद ५५७ धावसंख्येवर घोषित केला. कोहलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना २११ धावा फटकावल्या तर रहाणेने त्याला योग्य साथ देत १८८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने दिवसअखेर बिनबाद २८ धावांची मजल मारत सावध सुरुवात केली. आजचा खेळ थांबला त्यावेळी १७ धावा काढून नाबाद असलेल्या मार्टिन गुप्टीलला टॉम लॅथम (६) साथ देत होता. कोहलीने ३६६ चेंडूंना सामोरे जाताना २० चौकार ठोकले तर रहाणेने ३८१ चेंडूंमध्ये १८ चौकार व ४ षटकार मारले. कोहली बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रोहित शर्मा (नाबाद ५१ धावा, ६३ चेंडू) आणि रवींद्र जडेजा (नाबाद १७) यांनी ५९ चेंडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची अभेद्य भागीदारी केली असताना कर्णधार कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. रोहितची ही सलग तिसरी अर्धशतकी खेळी ठरली. कोहली आणि रहाणे आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे ह्यहीरोह्ण ठरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३६५ धावांची भागीदारी केली. भारतातर्फे चौथ्या विकेटसाठी ही सर्वोत्तम तर एकूण पाचवी सर्वोच्च भागीदारी ठरली. कोहलीने या खेळीदरम्यान विंडीजविरुद्ध नॉर्थ साऊंडमध्ये केलेल्या २०० धावांच्या तर रहाणेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध एमसीजीमध्ये केलेल्या १४७ धावांच्या खेळीचा वैयक्तिक विक्रम मोडला. कोहली कर्णधार म्हणून दोनदा द्विशतकी खेळी करणारा पहिला भारतीय ठरला. कोहली व रहाणे यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवले. शनिवारी अखेरच्या सत्रानंतर रविवारी पहिल्या दोन सत्रात त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. कालच्या ३ बाद २६७ धावसंख्येवरून आज पुढे खेळताना भारताने पहिल्या सत्रात २७ षटकांत विकेट न गमावता ९१ धावांची तर दुसऱ्या सत्रात ३० षटकांत ९८ धावांची भर घातली. कोहली-राहणे जोडीने भारतातर्फे चौथ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम नोंदवला. यापूर्वी सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी जानेवारी २००४ मध्ये एससीजीवर ५५३ धावांच्या भागीदारीचा विक्रम नोंदवला होता. आज कोहली-रहाणे जोडीने हा विक्रम मोडला. आॅफ स्पिनर जीतन पटेलने (२-१२०) चहापानानंतर कोहलीला पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. कोहली माघारी परतल्यानंतर रहाणे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या (२-११३) गोलंदाजीवर यष्टिरक्षक वॉटलिंगकडे झेल देत माघारी परतला. रहाणेने २९ व्या कसोटी सामन्यांत आठव्यांदा शतकी खेळी केली. त्याआधी, कोहलीने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर लाँग लेगला एकेरी धाव घेत कारकिर्दीतील दुसरे द्विशतक पूर्ण केले. दरम्यान, खेळपट्टीवर नियमबाह्य पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जडेजाला पंचानी ताकीद दिली आणि त्याने दुसऱ्यांदा ही चूक केल्यामुळे पंचानी पाच धावांची पेनल्टी दिली. (वृत्तसंस्था)धावफलकभारत पहिला डाव :- मुरली विजय झे. लॅथम गो. पटेल १०, गौतम गंभीर पायचित गो. बोल्ट २९, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. सँटनर ४१, विराट कोहली पायचित गो. पटेल २११, अजिंक्य रहाणे झे. वॉटलिंग गो. बोल्ट १८८, रोहित शर्मा नाबाद ५१, रवींद्र जडेजा नाबाद १७. (अवांतर १०). एकूण १६९ षटकांत ५ बाद ५५७ (डाव घोषित). बाद क्रम : १-२६, २-६०, ३-१००, ४-४६५, ५-५०४. गोलंदाजी : बोल्ट ३२-२-११३-२, हेन्री ३५-३-१२७-०, पटेल ४०-५-१२०-२, सँटनर ४४-४-१३७-१, नीशाम १८-१-५३-०.न्यूझीलंड पहिला डाव :- मार्टिन गुप्टील खेळत आहे १७, टॉम लॅथम खेळत आहे ०६. अवांतर (५). एकूण ९ षटकांत बिनबाद २८. गोलंदाजी : शमी २-०-५-०, यादव २-०-७-०, अश्विन ३-१-९-०, जडेजा २-१-२-०.