ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. 7 - सर्वोत्कृष्ट फिनिशर मानला जाणा-या धोनीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वांत कूर्मगती खेळी केली. चौथ्या सामन्यात त्याने 114 चेंडूत केवळ 54 धावा केल्या पण 190 चे विजयी लक्ष्य गाठून देऊ शकला नव्हता. याच खेळीमुळे धोनीच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. संथ फलंदाजीमुळे धोनीवर जोरदार टीका करण्यात आली होती. पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराटने धोनीची पाठराखण केली. यावेळी धोनीच्या टीकाकारांना त्याने सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला धोनीनं कसं खेळावं हे कोणीही सांगायची गरज नाही.
आणखी वाचा Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी
धोनीच्या निवृत्तीच्या मागणीविषयी प्रश्न विचारताच कोहलीने धोनीचे समर्थन केले. यावर तो म्हणाला, परिस्थितीनुरुप खेळणे आणि धावसंख्येला आकार देणे हे अनुभवी खेळाडूंना सांगण्याची गरज नाही. विकेट कशी आहे याकडेही लक्ष द्यावे लगेल. ती विकेट खेळण्यायोग्य नव्हतीच. एक सामना किंवा एक खेळी खराब झाल्यामुळे संयम सोडण्याची गरज नाही. कुठल्याही फलंदाजाला एखाद्या सामन्यात खराब फॉर्मचा सामना करावा लागू शकतो. धोनीबाबत कुठली समस्या आहे, असे मला वाटत नाही.
आणखी वाचा - सात वर्षात पहिल्यांदाच रहाणेनं केला हा पराक्रम
हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्यासारखे खेळाडू संघात असल्याबद्दल मी खूष असून हे फलंदाज तळाच्या स्थानावर आक्रमकता जोपासतात, असे कर्णधार विराट कोहलीचे मत आहे. अपेक्षा असताना कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत संघात फारसे काही बदल केले नाहीत. मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर कोहली म्हणाला, तुम्ही कुठल्याही संघाला सोहजपणे घेऊ शकत नाहीत. हार्दिक आणि केदारसाख्यांना तुम्ही वरच्या स्थानावर तसेच आघाडीच्या फलंदाजांना तळाच्या स्थानावर खेळवू शकत नाही.
आणखी वाचा - विराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांचा सन्मान राखावाच लागतो. खेळपट्टीचे स्वरूप कसे आहे. हे ओळखून डावपेचांवर ठामपणे अंमल करण्याविषयी विचार केला पाहिजे. हार्दिक आणि केदार यांच्यात आम्ही सर्व खेळाडू आत्मविश्वास जागविण्याचे काम करतो. त्यांच्या क्षमतेवर विश्वास असल्याने दोघेही प्रभावी कामगिरी करण्यास नेहमी सज्ज असतात, असे सांगून तो म्हणाला, नेहमी एकसारखे बाद होणे आपल्याला पसंत नाही. चुका सुधारणे तसेच कामगिरी करणे हेच माझ्या यशाचे गमक आहे.