शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

"लोकमत"च्या पोलमध्ये कुंबळेसमोर कोहलीचा "विराट" पराभव

By admin | Published: June 22, 2017 9:49 PM

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वाद शिगेला पोहोचल्याचे जगजाहीर झाल्यानंतर विराट कोहलीवर टीकेची झोड

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वाद शिगेला पोहोचल्याचे जगजाहीर झाल्यानंतर विराट कोहलीवर टीकेची झोड उठत आहे. लोकमतच्या ऑनलाइन पोलमध्येही कोहलीवर चाहत्यांनी "विराट" तोंडसूख घेतलं आहे. कुंबळेच प्रशिक्षक हवा असा कौल नेटीझन्सनी दिला आहे.  या पोलमध्ये कुंबळेसमोर विराट क्लीन बोल्ड झाला आहे, काहींनी तर विराटपेक्षा धोनीच चांगला असंही मत व्यक्त केलं आहे. लोकमतच्या पोलमध्ये कुंबळेने कोहलीपेक्षा जवळपास तिप्पट मतं मिळवली आहेत.  
 
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीपासूनच कुंबळे आणि कोहली यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. आता कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर दोघांबाबात रोज नवनवे खुलासे होतच आहेत. त्यातच कोहलीने कुंबळेंची प्रशिक्षकपदावर नियुक्ती झाल्यानंतर कुंबळेच्या स्वागतासाठी केलेलं ट्विट डिलीट करुन हा वाद किती पराकोटीला गेला आहे हेच दाखवून दिलं आहे.
 
पाकिस्तानसोबत झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे आधीच चिडलेल्या देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये कुंबळे-कोहलीच्या वादाच्या पार्श्वभूमिवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळेच या वादामध्ये क्रिकेटचे चाहते नक्की कोणाच्या बाजूने आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. आम्ही घेतलेल्या लाइव्ह पोलला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला. अनिल कुंबळेच्या प्रशिक्षकपदाच्या राजीनाम्यानंतर "कोहली कॅम्प" टीकेचं लक्ष्य ठरला आहे. कॅप्टन कोहलीनं कुंबळेसारख्या "जंटलमन" क्रिकेटवीराचा बळी घेतला, असा सूर क्रिकेटवर्तुळात ऐकू येतोय. हाच मुद्दा पकडून लोकमतने तुम्ही कोणाच्या बाजूने कोहली की कुंबळे? असा प्रश्न चाहत्यांना विचारला होता. केवळ तीन तासांसाठी घेतलेल्या या पोलमध्ये चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
("अनिल कुंबळे खेळाडूंना शाळकरी मुलांप्रमाणे वागवायचा")
(कुंबळेची विकेट काढली, कोहली आता करून दाखव !)

 

अवघ्या दोन तासात या पोलमध्ये 22 हजाराहून जास्त चाहत्यांनी आपलं मत नोंदवलं. यामध्ये चाहत्यांचा कौल हा स्पष्टपणे अनिल कुंबळेच्याच बाजूने असल्याचं पाहायला मिळालं. 16 हजार 500 हून अधिक मतं कुंबळेच्या बाजूने पडली तर कोहली योग्य असल्याचं केवळ 6 हजार चाहत्यांचं मत होतं. म्हणजेच कुंबळेची विकेट घेऊन कोहलीने चाहत्यांचा रोष ओढावून घेतल्याचं हा पोल स्पष्टपणे सांगत आहे.