राज्य तलवारबाजीत कोल्हापूरचे वर्चस्व
By admin | Published: September 22, 2016 1:16 AM
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर बुधवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कोल्हापूर विभागाने वर्चस्व राखताना ४ सुवर्ण, १ रौप्य व ३ कास्यपदकांची कमाई केली. कोल्हापूरने ३ सुवर्ण, २ रौप्य व कास्यपदके जिंकली. तिसर्या क्रमांकावर असणार्या मुंबईने ३ सुवर्ण, २ रौप्य //////////////////व ४///////////////////////, तर यजमान औरंगाबादने २ सुवर्ण, २ रौप्य व ५ कास्यपदकांची लूट केली. नागपूरने १ सुवर्ण, ३ रौप्य व २ कास्य, तर पुणे संघाने १ सुवर्ण व २ कास्यपदके मिळवली.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर बुधवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कोल्हापूर विभागाने वर्चस्व राखताना ४ सुवर्ण, १ रौप्य व ३ कास्यपदकांची कमाई केली. कोल्हापूरने ३ सुवर्ण, २ रौप्य व कास्यपदके जिंकली. तिसर्या क्रमांकावर असणार्या मुंबईने ३ सुवर्ण, २ रौप्य //////////////////व ४///////////////////////, तर यजमान औरंगाबादने २ सुवर्ण, २ रौप्य व ५ कास्यपदकांची लूट केली. नागपूरने १ सुवर्ण, ३ रौप्य व २ कास्य, तर पुणे संघाने १ सुवर्ण व २ कास्यपदके मिळवली.१७ वर्षांखालील गटात दुर्गेश जहागीरदार, झाकीर सय्यद, दीप मुंड व देवकुमार दुबे यांचा भरणा असणार्या औरंगाबाद विभागाने कोल्हापूरचा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. तत्पूर्वी, अ.भा. तलवारबाजी महासंघाचे सचिव अशोक दुधारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी सचिव उदय डोंगरे, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकश काटोळे, प्रशांत जगताप, राजकुमार सोमवंशी, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी गुरदीपसिंग संधू, कृष्णा केंद्रे, उमेश बडवे, चंद्रशेखर घुगे, भावराव वीर, गोकुळ तांदळे, सदानंद सावळे, भागवत गोरे, तनुजा गाढवे, पूनम नवगिरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, संजय भूमकर आदी उपस्थित होते.तेजस्विनीची निवडऔरंगाबाद : फ्रान्स येथे ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान होणार्या जागतिक रेल्वे नेमबाजी स्पर्धेसाठी तेजस्विनी मुळे हिची भारतीय रेल्वे संघात निवड झाली आहे. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित तेजस्विनीने १८ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण १२ पदके मिळवली आहेत. भारतीय रेल्वे संघात तेजस्विनीसह विश्वजित शिंदे व स्वप्नील कुसाळे यांचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून अभिजित मजुमदार असणार आहेत. या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपाध्यक्ष सतीश मांडे, सचिव मनीष धूत, साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर आदींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.