शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

‘मिशन आॅलिम्पिक’साठी कोल्हापुरी बळ

By admin | Published: September 02, 2016 3:11 AM

आॅलिम्पिकमधील कामगिरी ही प्रत्येक देशाच्या क्रीडाक्षेत्राची ओळख करून देत असते. भारताची ओळख भरीव आणि अग्रभागी ठेवण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

- प्रवीण देसाई, कोल्हापूर

आॅलिम्पिकमधील कामगिरी ही प्रत्येक देशाच्या क्रीडाक्षेत्राची ओळख करून देत असते. भारताची ओळख भरीव आणि अग्रभागी ठेवण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘मिशन आॅलिम्पिक - २०४०’ मध्ये देशातून शंभर पदके पटकाविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून खेळाडू घडविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. सन २०४० आॅलिम्पिक्समध्ये भारताला १०० पदके मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी तयार केलेल्या ‘प्रीप्रायमरी स्कूल लेव्हल फिटनेस ट्रेनिंग’ या पथदर्र्शी प्रकल्पाच्या www.ppfns.in या संकेतस्थळाचे उद्घाटन या महिन्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले.भारताच्या आॅलिम्पिकच्या इतिहासात १८९६ ते २०१२ पर्यंत १८ आॅलिम्पिक स्पर्धेत २६ पदके मिळाली आहेत. एवढ्या बलाढ्य देशाला पदक का मिळत नाही, या अनुषंगाने विचार केल्यावर खेळाडूंची निवड प्रक्रिया व त्यांच्या निवडण्याचा वयोगट ही चुकीची पद्धत आहे. म्हणजेच निवड प्रक्रियेत १० ते १४ वर्षे वयोगटातील मुले निवडली जातात. ही निवड उशिरा केली जाते. कोवळ्या वयातच खेळाडूमध्ये हा स्टॅमिना वाढवून त्याच्या आवडीनुसार खेळात त्याला प्रोत्साहन दिल्यास ‘आॅलिम्पिक’च्या पदकापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही.ही बाब लक्षात घेऊन मेजर सासने यांनी २०४० मध्ये भारताला १०० पदकांच्या नियोजनासाठी ‘प्रीप्रायमरी फिटनेस लेव्हल’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून, कोल्हापूर जिल्'ातील शाळांमध्ये राबविला जाणार आहे. त्यानंतर तो देशातील कमीत कमी एक लाख शाळांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या प्रकल्पात मोटर क्वालिटीच्या टेस्ट असल्यामुळे लहान मुलांचे फिटनेस स्टँडर्ड लवकरच पालकांना व शिक्षकांना दिसून येणार आहे.सरकारी शाळांत मोफत, तर खासगी शाळांमध्ये माफक शुल्क आकारले जाणार आहे. मुलाच्या सरावानंतर दोन वर्षांत तो कुठल्या गेममध्ये आॅलिम्पिकमध्ये खेळू शकेल हे त्याच्या शिक्षकांना व पालकांना सांगितले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी शाळांना वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.भारतामध्ये खेळाडूंची निवड प्रक्रिया व त्यांचा निवडण्याचा वयोगट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करून हा नवा पथदर्र्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. लहान मुलांना प्रीप्रायमरी स्कूल लेव्हलला खेळांचे ट्रेनिंग देण्याच्या उद्देशाने आम्ही हा प्रोग्रॅम प्लॅन तयार केला आहे. - निवृत्त मेजर सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूरअशी होणार संकेतस्थळावर नोंदणीसन २०४० आॅलिम्पिक्समध्ये १०० पदकांसाठी ‘खेळ क्रांतीचा आगाज’ या प्रीप्रायमरी स्कूल लेव्हल फिटनेस ट्रेनिंग पथदर्र्शी प्रकल्पाच्या www.ppfns.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करा व हे जे आहे लक्ष्य आहे, ते साध्य करण्यासाठी मदत करा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी यावेळी केले.