शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

मानधनवाढीसाठी कुंबळेची शिफारस

By admin | Published: May 22, 2017 2:38 AM

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी ‘अ’ श्रेणी खेळाडूंच्या तसेच सपोर्ट स्टाफच्या केंद्रीय कराराच्या मानधनात १५० टक्के वाढीची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी ‘अ’ श्रेणी खेळाडूंच्या तसेच सपोर्ट स्टाफच्या केंद्रीय कराराच्या मानधनात १५० टक्के वाढीची शिफारस केली आहे. हैदराबाद येथे प्रशासकीय समिती (सीओए) तसेच बीसीसीआयचे आधिकारी सीईओ राहुल जौहरी, संयुक्त सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांच्यापुढे अनिल कुंबळेने हा प्रस्ताव सादर केला. कर्णधार कोहली हा हैदराबाद येथे उपस्थित नव्हता. मात्र, त्याने स्काईपीद्वारे पॅनलपुढे आपले मत मांडले. सध्या ‘अ’ श्रेणी खेळाडूंना दोन कोटी, ‘ब’ श्रेणी खेळाडूंना एक कोटी आणि ‘क’ श्रेणी खेळाडूंना ५० लाख रुपये हे वार्षिक स्वरूपात मिळतात. सूत्रांनुसार, कुंबळे आणि कोहली या दोघांच्या मते ‘अ’ श्रेणी खेळाडूंना एका सत्रासाठी पाच कोटी रुपये मिळायला हवेत. विनोद राय आणि विक्रम लिमये यांनी कुंबळे आणि कोहलीची मते जाणून घेतली, या प्रस्तावावर बीसीसीआयचे पदाधिकारी गांभीर्याने विचार करतील. आता जौहरी, अमिताभ आणि अनिरुद्ध हे या प्रस्तावावर निर्णय घेतील. यासंबंधीचा अहवाल तयार करून तो सीओएकडे पाठविला जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की अनिल आणि विराट यांनी वेगवेगळी मते मांडली; परंतु कसोटी क्रिकेटला अधिक महत्त्व द्यायला पाहिजे, यावर दोघांचाही भर होता. सोबत चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूला आयपीएलचा करार मिळाला नाही. दुसरीकडे पवन नेगीसारखा खेळाडू रणजी चषकातही खेळत नाही. त्याला ४५ दिवसांत ८.५ कोटी रुपये मिळतात. या तुलनात्मक गोष्टीवरही विचार व्हायला हवा.