शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ललिताने रचला इतिहास, ऑलिम्पिकची फायनल गाठणारी भारताची पहिली अॅथलीट

By admin | Published: August 13, 2016 8:45 PM

महाराष्ट्राची शान असलेली ललिता बाबरने महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतील अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चत करून इतिहास रचला आहे

- शिवाजी गोरे 
रिओ दी जानेरो, दि. 13 - सातारा जिल्ह्यातील मोही (ता माण)या छोटयाश्या गावातील महाराष्ट्राची शान असलेली ललिता बाबरने महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतील अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चत करून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारी ललिता पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. यासोबतच ललिताने राष्ट्रीय विक्रमदेखील रचला आहे.  
 
प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत 9 मिनिटं आणि 19.76 सेकंदांची वेळ नोंदवून ललिता बाबरने नवा राष्ट्रीय विक्रम रचला आहे.  जगभरातल्या एकूण 52 धावपटूंमध्ये सातवं स्थान मिळवत ललिताने अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित झाला. 15 ऑगस्टला अंतिम फेरी पार पडणार आहे. ललिता बाबर यावेळी पदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा ठसा उमटवेल अशी सर्वांना आशा आहे.
 
‘माणदेशी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणा-या ललिता शिवाजी बाबर शुक्रवारी सकाळी येते थंड वातावरणात जेव्हा महिलांच्या तीन हजार मीटर शर्यतसाठी ललिता मैदानावर आली तेव्हा नेहमीप्रमाणे तीच्या चेहºयावर कोणतेही भाव नव्हते. मात्र चेहºयावर आत्मविश्वास होता. जेव्हा शर्यत सुरु झाली तेव्हा तीने पहिल्या कोर्बन इम्मा, चेपोक्चे बेटराईस, छारीबी हाबीबा, हेनरेना हिल्स व कोवालमाट्याल्हा यांच्या जथ्थात आपली वर्णी लावली. सुरूवातीपासून तीने कोणतीही घाई न करता शर्यतीत आघाडीवर राहण्याचा प्रयत्न (रेज लीड) केला नाही. तीने मात्र पहिला जथ्था सोडला नाही. साडेसात फे-याच्या या शर्यतीत ललिताने सहा फे-यापर्यंत आपला जथ्था सोहला नाही. नंतर तीने पहिल्या चेपोक्चे बोटराईस, छारीवी हाबीबा यांच्या बरोबरीने धावत होती. शेवटची ६ मीटर राहिले असताना तीने थोडी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. पण, तीच्या बरोबर धावणाºया धावपटू बरोबरच होत्या. 
 
शेवटच्या दोन मिटरला ती चौथ्या क्रमांकावर आली आणि तीने याच क्रमांकावर ९ मिनिट १९.७६ सेकंदाची वेळ नोंदविली. जेव्हा तीने शर्यत पूर्ण केली तेव्हा ती पात्र होणार की नाही याकडे सर्वांचे लागून राहिले. पण जेव्हा दुसºया व तीसºया फेरीचा निकाल जाहिर झाला. तेव्हा तीच्यासह सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अंतिम फेरीसाठी तीन्ही फेºयांमधून पहिले तीन म्हणजे एकूण ९ आणि पराभूत झालेल्या धावपटूंमध्ये ज्यांनी चांगली वेळ नोंदविली त्यातील पहिले ६ धावपटू होणार होते. आणि ललिताने जी वेळ नोंदविली त्यामुळे ती एकूण सातव्या क्रमांकावर पोहोचली, या तिच्या अंतिम फेरीतील प्रवेशाने अ‍ॅथलेटिक्समधील पदकाची आशा उंचावली आहे. दुसरीकडे भारताच्या सुधा सिंगला मात्र अंतिम फेरीत पात्र होण्यात अपयश आले.