शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

ललिता बाबरने मोडला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम

By admin | Published: August 25, 2015 4:15 AM

भारताची ललिता शिवाजी बाबर हिने आपला राष्ट्रीय विक्रम मोडताना येथे सोमवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या ३,००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत

बीजिंग : भारताची ललिता शिवाजी बाबर हिने आपला राष्ट्रीय विक्रम मोडताना येथे सोमवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या ३,००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली.माजी आशियाई चॅम्पियन ललिताने दुसऱ्या हिटमध्ये ९ मिनिटे २७.८६ सेकंदांचा वेळ नोंदवताना चौथे स्थान मिळवले. तसेच, बुधवारी होणाऱ्या फायनलसाठी ती पात्रही ठरली. या जबरदस्त कामगिरीबरोबरच ललिता सर्वच तीन हिटमध्ये सर्वांत वेगवान अ‍ॅथलिटमध्ये समाविष्ट झाली. त्याचबरोबर ललिताने ६ सेकंद कमी वेळ घेऊन आपला राष्ट्रीय विक्रमही मोडला. तिने जून महिन्यात वुहान येथील चॅम्पियनशिपमध्ये ९ मिनिटे ३४.१३ सेकंद वेळ नोंदवताना विक्रम केला होता. या महाराष्ट्राच्या २६ वर्षीय अ‍ॅथलिटने २०१४च्या आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.विश्व चॅम्पियनशिपच्या ३,००० मीटर स्टिपलचेसमध्ये पात्र ठरणारी ललिता ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. ट्युनिशियाची आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त हबिबी घिरिबीने ९ मिनिटे २४.३८ सेकंद ही सर्वोत्तम कामगिरी करून हिट जिंकली आणि अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरली. दुसऱ्या स्थानी जर्मनीची जेसा फेलिसितास क्राउसे राहिली. तिने ९ मिनिटे २४.९२ सेकंद वेळ नोंदवली. इथिओपियाची हिवोत आयालियू तिसऱ्या स्थानी राहिली. तिने ९ मिनिटे २५.५५ सेकंद वेळ नोंदवला. (वृत्तसंस्था)