ऑनलाइन लोकमतरिओ, दि. 15 - 3000 मीटर स्टीपलचेसच्या शर्यतीत भारताची ललिता बाबर 9 व्या स्थानी, महाराष्ट्राची खेळाडू ललिता बाबरचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ललिताने फायनलमध्ये मजल मारल्याने तिच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. भलेही तिला पदक मिळाले नसले तरी १९८४ नंतर फायनलमध्ये मजल मारणारी ती एकमेव खेळाडू आहे.महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय ललितासाठी पदक जिंकण्याचा मार्ग खडतर आहे. ती १९८४ लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषानंतर अॅथलेटिक्स फायनलसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली होती. दोघीही पदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या नसल्या तरी देशातील नागरिकांकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी भारतीयांच्या मनात घर केलं आहे.ललिता १९.७६ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहताना फायनलला पात्र ठरण्यात यशस्वी ठरली. ती सर्वच क्वॉलिफायरमध्ये सातव्या स्थानावर आली. तिच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर तिचे आई-वडील यांना महाराष्ट्राच्या मंदिरात जाऊन पूजा करताना दाखविले गेले आणि ती आज आपल्या कामगिरीत सुधारणा करू शकली तर ती अॅथलेटिक्समध्ये भारताची नवीन स्टार म्हणून पुढे येईल. आता ललिता उषाच्या कामगिरीत सुधारणा करू शकेल अथवा नाही हे पाहावे लागेल. पीटी उषाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. फायनलमध्ये ललिताला वर्ल्डचॅम्पियन, गत आॅलिम्पिक चॅम्पियन आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या धावपटूंचे आव्हान असणार आहे.
स्टीपलचेसच्या शर्यतीत भारताची ललिता बाबर 9व्या स्थानी
By admin | Published: August 15, 2016 10:15 PM