मुंबई : रिओ आॅलिम्पिकच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत दहाव्या स्थानावर राहिलेली साताऱ्याची अॅथ्लीट ललिता बाबर हिला महाराष्ट्र सरकारने सोमवारी शासकीय नोकरीची आॅफर दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललिताचा सन्मान केला.मुख्यमंत्र्यांनी ललिताला शुभेच्छा देत राज्य शासनाच्यावतीने नोकरीची आॅफर दिली. ‘मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आता २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल. पी. टी. उषा यांच्यानंतर आॅलिम्पिक फायनल गाठणारी मी पहिली खेळाडू असल्याचा अभिमान आहे,’ असे ललिताने सांगितले तमाशा कलावंतांकडून बक्षिसदरम्यान, सातारा जिल्ह्यातील तमाशा कलावंतांनी ललिता बाबरला एक लाख रुपये रोख देण्याची घोषणा केली. तसेच, शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ललिताला १५ लाखांचा रोख पुरस्कार जाहीर केला होता. (वृत्तसंस्था)
ललिताला महाराष्ट्र सरकारची नोकरीची ‘आॅफर’
By admin | Published: August 23, 2016 4:35 AM