मीरपूर : तीन वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत विजय मोहीम कायम राखताना मंगळवारी उपांत्य फेरीत श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. निराशाजनक सुरुवातीनंतर सावरताना भारताने ९ बाद २६७ धावांची मजल मारली आणि त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत श्रीलंकेचा डाव ४२.४ षटकांत १७० धावांत गुंडाळला. फलंदाजीमध्ये अनमोलप्रित सिंग (७२ धावा, ९२ चेंडू) आणि सरफराज खान (५९ धावा, ७० चेंडू) भारताचे स्टार परफॉर्मर ठरले. सरफराजने या स्पर्धेत पाच डावांमध्ये चौथ्यांदा अर्धशतकी खेळी केली. तीन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला आता १४ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ऋषभ पंत (१४) आणि कर्णधार ईशान किशन (७) ही सलामीची जोडी झटपट माघारी परतली. त्यामुळे १० षटकांत भारताची २ बाद २७ अशी स्थिती होती. ढगाळ वातावरणात फलंदाजी करणे आव्हान होते, पण अनमोलप्रित सिंग व फॉर्मात असलेला सरफराज यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२६ चेंडूंमध्ये ९६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. सरफराजने आपल्या खेळीत सहा चौकार व १ षटकार ठोकला.(वृत्तसंस्था)धावफलकभारत : ऋषभ पंत झे. विशाद डिसिल्वा गो. फर्नांडो १४, इशान किशन झे. विशाद डिसिल्वा गो. कुमारा ७, अनमोलप्रीत सिंह झे.विशाद डिसिल्वा गो. निमेश ७२ , सर्फराज खान झे. अशान गो. फर्नांडो ५९ , वॉशिंग्टन सुंदर झे.विशाद डिसिल्वा गो. निमेश ४३, अरमान जाफर झे. असालंका गो. फर्नांडो २९, महिपाल लोमरोर झे. कुमारा गो. फर्नांडो ११, मयांक डागर झे. डिसिल्वा गो. कुमारा १७, राहुल बाथम धावबाद विशाद डीसिल्वा/कुमार, आवेश खान नाबाद १, खलील अहमद नाबाद १; अवांतर १३ ; २६७/९; गोलंदाजी : असिथा फर्नांडो ४/४३, लहिरु कुमारा २/५०, थिलान निमेश २/५०, श्रीलंका : कविन बंदरा धावबाद आवेश खान/ऋषभ पंत २, अविष्का फर्नांडो पायचीत आवेश खान ४, कमिन्डू मेन्डीस झे. सुंदर गो. डागर ३९, चरिथ असालंका झे. लोमरोर गो. बाथम ६, शम्मु अशान धावबाद इशान किशन/सर्फराज खान ३८, विशाद डिसिल्वा झे. पंत गो. आवेश खान २८, दमिथा सिल्वा गो. वॉशिंग्टन सुंदर २४, वाहिंदु डिसील्वा झे.आवेश खान गो. अहमद ८, थिलान निमेश झे. खान गो. डागर ७, चरिथ कुमारा नाबाद ०, असिथ फर्नांडो झे. अनमोलप्रीत सिंह गो. डागर ०; अवांतर १४; सर्वबाद १०/१७०; गोलंदाजी : आवेश खान ९-०-४१-२, के.के अहमद ८-१-३४-१, राहुल बाथम ६.५ - १-१९-१, वॉशिग्टंन सुंदर ७-२७-१, मयांक डागर ५.४-०-२१-३.
यंग ब्रिगेडकडून लंका पराभूत
By admin | Published: February 10, 2016 3:48 AM