ड्युनेडिन : न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ४३१ धावांचा पाठलाग करणारा श्रीलंका संघ सुरुवातीच्या धक्क्यातून सावरला आहे. पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा या संघाने चार बाद १९७ पर्यंत सावध वाटचाल केली. दिनेश चंडीमल आणि दिमुथ करुणारत्ने यांनी धावसंख्येला आकार दिला.एकवेळ लंकेची स्थिती दोन बाद २९ अशी होती. चंडीमल-करुणारत्ने यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली. चंडीमल ८३ आणि के. व्हितानेज दहा धावांवर नाबाद आहेत. करुणारत्ने सात चौकारांसह ८४ धावा काढून बाद झाला. चंडीमलने २०८ चेंडू खेळून नऊ चौकार मारले. त्याआधी सकाळी न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आला. लंकेची सुरुवात मात्र खराब झाली. मेंडिस आणि जयसुंदरा हे झटपट बाद झाले. दोघांनीही यष्टिमागे वॉटलिंगकडे झेल दिले. उपाहार आणि चहापान या कालावधीत केवळ ६५ धावा निघू शकल्या. अखेरच्या सत्रात लंकेच्या फलंदाजांनी १३ षटकांत ४८ धावा काढल्या. करुणारत्ने हा लेगस्पिनर मिशेल सेंटेनरचा बळी ठरला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज केवळ दोन धावा करीत बाद झाला. टीम साऊदीच्या चेंडूवर वॉटलिंगने त्याचा झेल टिपला. पंच नायजेल लाँग यांनी त्याला नाबाद ठरविले होते, पण न्यूझीलंडने रेफरलमध्ये यश मिळविले. (वृत्तसंस्था)धावफलक : न्यूझीलंड - सर्व बाद ४३१; श्रीलंका - १९७/४दिमुथ करुणारत्ने - ८४, दिनेश चंडीमल - ८३, गोलंदाजी - ट्रेंट बोल्ट - ३८ /१, टीम साऊदी - ३५ /१, नील वॅग्नर - ५३/१, मिशेल सॅन्टनर ३७/१
न्यूझीलंडविरुद्ध लंकेने डाव सावरला
By admin | Published: December 12, 2015 12:11 AM