शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

लंकेला दणका

By admin | Published: November 03, 2014 2:35 AM

भारताने ५ बाद ३६३ अशी दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंका संघाचा डाव ३९.२ षटकांत १९४ धावांत गुंडाळला.

कटक : शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.भारताने ५ बाद ३६३ अशी दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंका संघाचा डाव ३९.२ षटकांत १९४ धावांत गुंडाळला. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेतर्फे माहेला जयवर्धने (४३), थिसारा परेरा (२९), उपुल थरंगा (२८) व अँजेलो मॅथ्यूज (२३) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. भारतातर्फे ईशांत शर्माने ३४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. त्याआधी, सलामीवीर अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने आज बाराबती स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र खेळल्या जात असलेल्या लढतीत ५ बाद ३६३ धावांची दमदार मजल मारली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. रहाणेने १०८ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व २ षटकारांच्या साह्याने १११ धावांची खेळी केली. रहाणेचे हे वन-डे क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. धवनने १०७ चेंडूंमध्ये १४ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने ११३ धावा फटकाविल्या. धवनचे कारकिर्दीतील सहावे, तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्धच्या ११९ धावांच्या खेळीनंतरचे पहिले शतक आहे. या दोन्ही फलंदाजांना अनुभवी यष्टिरक्षक कुमार संगकाराकडून जीवदान मिळाले. त्याचा लाभ घेत या दोन्ही फलंदाजांनी सलामीला २३१ धावांची भागीदारी केली. सुरेश रैनाने ३४ चेंडूंमध्ये ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा फटकाविल्या. रैनाने कारकिर्दीतील २०० वा सामना खेळताना अर्धशतकी खेळी करीत वन-डे क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठला. फिरकीपटू अक्षर पटेलने आक्रमक खेळी करताना धम्मिका प्रसादच्या अखेरच्या षटकात २ षटकार ठोकले. अक्षर १४ धावा काढून नाबाद राहिला. भारताने बाराबती स्टेडियममध्ये दुसऱ्यांदा ३०० धावांची वेस ओलांडली. यापूर्वी १९९८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३ बाद ३०१ धावा फटकाविल्या होत्या. अलीकडेच आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने मे महिन्यात चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध या मैदानावर ४ बाद २३१ धावा फटकाविल्या होत्या. त्या लढतीत एकूण ४१८ धावा फटकाविल्या गेल्या होत्या. तातडीने आयोजित करण्यात आलेल्या या दौऱ्यासाठी सज्ज नसल्याचे श्रीलंकेचा कर्णधार मॅथ्यूजने यापूर्वी स्पष्ट केले होते. आज मैदानावर श्रीलंका संघाचे क्षेत्ररक्षण बघितल्यानंतर याची प्रचिती आली. याव्यतिरिक्त लसिथ मलिंगा व रंगना हेराथ यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले.माजी कर्णधार कुमार संगकाराने धवन व रहाणे यांना अनुक्रमे १० व ३८ च्या वैयिक्तक धावसंख्येवर जीवदान दिले. त्यामुळे श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसाद व लाहिरू गमागे यांना सुरुवातीला प्रभावी मारा केल्यानंतरही लाभ घेता आला नाही. भारताच्या सलामीवीरांना पहिल्या ५ षटकांमध्ये केवळ १४ धावा फटकाविता आल्या होत्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये केवळ ४३ धावा फटकाविल्या गेल्या. त्यानंतर रहाणेने आक्रमक फलंदाजी केली. त्याला धवनची योग्य साथ लाभली. रहाणेने ६१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. २१ व्या षटकात सूरज रणदीवच्या गोलंदाजीवर २१ धावा वसूल करणाऱ्या धवनने ६४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकाविले. रहाणेने ३२ व्या षटकात एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले, तर धवनने सिकुगे प्रसन्नाच्या गोलंदाजीवर मिडविकेटला षटकार ठोकत शतकाला गवसणी घातली. अशान प्रियांजनने धवनला क्लीन बोल्ड करीत श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. (वृत्तसंस्था)