शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

लक्ष्मीपती बालाजीची प्रथम श्रेणीतून निवृत्ती

By admin | Published: September 15, 2016 11:01 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बालाजीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली

चेन्नई : भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बालाजीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली, पण तो इंडियन प्रीमिअर लीग आणि तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळण्यासह तामिळनाडू संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत कायम राहणार आहे. ३४ वर्षीय बालाजीने २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यात संस्मरणीय कामगिरी केली होती. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना सांगितले की,‘मी भविष्याबाबत विचार करतो. आता मला कुटुंबासोबत वेळ घालविता येईल. मी प्रथम श्रेणी क्रिकेटला १६ वर्षे दिली आहे, पण आयपीएल व टीएनपीएलमध्ये खेळणे कायम ठेवणार आहे.’ आक्रमक गोलंदाज बालाजीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द छोटेखानी ठरली. त्याने केवळ ८ कसोटी, ३० वन-डे आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कारकिर्दीत १०६ प्रथम श्रेणी सामन्यात १२.१४ च्या सरासरीने १२०२ धावा केल्या आहेत तर २६.१० च्या सरासरीने ३३० बळी घेतले आहेत. पाकिस्तान दौऱ्यात यजमान संघाच्या दिग्गज फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने अडचणीत आणणाऱ्या बालाजीने या दौऱ्याची आठवण ताजी करताना म्हटले की, ‘मी आऊटस्विंग चेंडू टाकला आणि इंजमान -उल-हकला त्याचा अंदाज आला नाही. मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही. कारण आम्ही प्रथमच पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली होती.’दरम्यान, बालाजीला कारकिर्दीत अनेकदा दुखापतींना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याला बराच वेळ राष्ट्रीय संघातून बाहेर राहावे लागले. बालाजीने माजी क्रिकेटपटूंची आठवण करताना म्हटले की,‘अनिल कुंबळे व झहीर खान यांनी मला माझ्या कारकिर्दीत बरीच मदत केली. झहीर चांगली व्यक्ती असून त्याने नेहमी माझे मनोधैर्य उंचावण्यास मदत केली.’