मुंबई : ११ जूनपासून झिम्बाब्वेत आयोजित मर्यादित षटकांच्या मालिकेत दुय्यम दर्जाच्या संघाचे नेतृत्व करताना वेगळ्या खेळाडूंसोबत काम करण्याचे आव्हान पेलण्यासाठी उत्सुक असल्याचे भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने म्हटले आहे.विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि रविचंद्रन आश्विन यांच्यासारख्या सीनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत धोनी नवे चेहरे असलेल्या संघाचे नेतृत्व करणार आहे. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलाताना धोनी म्हणाला, ‘‘माझ्यासाठी हा अगदी वेगळा अनुभव राहणार आहे. कारण कारकिर्दीत जास्तीत जास्त काळ खेळाडूंच्या एका समूहासोबत खेळत असताना तुम्हाला जबाबदारीची कल्पना असते. या मालिकेसाठी निवड झालेल्या संघातील अनेक खेळाडूंसोबत मी प्रथमच खेळणार आहे. त्यामुळे त्यांची मजबूत बाजू काय आहे. संघाचा समतोल साधण्यासाठी कुठल्या खेळाडूचा कोणत्या स्थानावर उपयोग करता येईल, या बाबी झटपट समजून घेणे आवश्यक ठरते. संघ समतोल भासत आहे.’’ भारतीय संघ ११ ते २२ जून या कालावधीत झिम्बाब्वेविरुद्ध तीन वन-डे व तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. सर्व सामने हरारे येथे होतील. धोनीच्या मते नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. कारण सर्व सामने दिवसा खेळले जाणार आहेत. (वृत्तसंस्था)>कर्णधारपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआयकडेक्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करेल. मी केवळ खेळाचा आनंद घेत असून विराटकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत संघाचे नेतृत्व सोपविण्याचा अधिकार केवळ बोर्डाकडे आहे, असे धोनी म्हणाला.
युवा संघाचे नेतृत्व करणे वेगळे आव्हान
By admin | Published: June 08, 2016 4:30 AM