नवी दिल्ली : कर्णधार सरदारसिंग याच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यांचा भारतीय हॉकी संघ आगामी २ आॅक्टोबरपासून न्यूझीलंड दौरा करेल. रियो आॅलिम्पिकसाठी सहा सामन्यांची ही मालिका मोलाची ठरणार आहे.हॉकी इंडियाने बुधवारी संघ जाहीर केला. २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत रायपूर येथे हॉकी वर्ल्ड लीगचे आयोजन होत असून त्याआधी भारताचा न्यूझीलंड दौरा तयारीचा भाग असेल, असे हॉकी इंडियाने स्पष्ट केले. हायपरफॉर्मन्स मॅनेजर आणि मुख्य कोच रोलॅन्ड ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनात मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित तयारी शिबिरानंतर संघाचीघोषणा करण्यात आली. अनुभवी खेळाडू पी. आर. ब्रिजेश हा उपकर्णधार असतील. या दौऱ्यात भारताची नजर न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळविण्याकडे असेल. या दृष्टीने तयारी शिबिरात पासेस तसेच पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्याच्या तंत्रावर अधिक भर देण्यात आला.न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत ओल्टमन्स म्हणाले,‘या दौऱ्यात सकारात्मक निकाल येण्याची आशा आहे. डेव्ह स्टेनिफोर्थ तीन आठवड्यांचे गोलकिपिंग शिबिर घेत असल्यामुळे गोलकिपरला स्वत:चे तंत्र सुधारण्यास मदत होईल. (वृत्तसंस्था)गोलकीपर : पी आर श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योतसिंग, बचावफळी : बीरेंद्र लाकडा, कोठाजीतसिंग, व्ही. आर., रघुनाथ, जसजीतसिंगखुल्लर, रूपिंदरपाल सिंग, गुरजिंदरसिंग, मधली फळी : सरदारसिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग, एस. के. उथप्पा, सतबीरसिंग, देवेंद्र वाल्मीकि, मनप्रीतसिंग, धर्मवीरसिंग, आघाडीची फळी : एस. व्ही. सुनील, रमनदीपसिंग, आकाशदीपसिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय आणि निकिन तिमय्या
हॉकी संघाचे नेतृत्व सरदारकडे
By admin | Published: September 23, 2015 11:00 PM